IPL 2021: भुवनेश्वरसोबत या गाण्यावर डेव्हिड आणि राशीदने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

भुवीने राशीद खानचे या व्हि़डीओसाठी आभार देखील मानले आहेत. या तिघांच्या डान्सचा हा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Apr 12, 2021, 03:42 PM IST
 IPL 2021:  भुवनेश्वरसोबत या गाण्यावर डेव्हिड आणि राशीदने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई: नुकताच हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामना पार पडला. या सामन्यात 10 धावांनी हैदराबादचा पराभव झाला. तर कोलकाता संघ आतापर्यंतच्या IPLमधील 100 वा सामना जिंकला आहे. त्याचा आनंद कोलकाताने साजरा केला. याच दरम्यान हैदराबाद संघातील तीन जबरदस्त खेळाडूंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिघेही जण डान्स करताना दिसत आहे. 

मास्टर सिनेमातील वाथी कमिंग गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. त्याच गाण्यावर अनेक कलाकारांनीही डान्स केल्याचं पाहिलं. आता हेच वाथी कमिंग गाण्याचं भुत हैदराबाद संघातील तिघांमध्ये शिरलं आहे. भुवनेश्वर कुमार, डेव्हि़ड वॉर्नर आणि राशीद खानने वाथी कमिंग गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

भुवी, डेव्हि़ड आणि राशीदने केलेला डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राशीदनं इन्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करताच भरभरून कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओला 9 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. राशीद खानची स्माईल खूपच छान असल्याचं एकाने म्हटलं आहे. भुवीने राशीद खानचे या व्हि़डीओसाठी आभार देखील मानले आहेत. या तिघांच्या डान्सचा हा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे.