मुंबई: प्रेम व्यक्त करण्यासाठी वयाचं, भाषेचं किंवा संस्कृतीचं बंधन नसतं. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर IPLस्थगित झाल्यामुळे स्वदेशी परतला आहे. त्याने आपल्या पत्नीप्रती इन्स्टावर फोटो शेअर करत तेलगू भाषेतून प्रेम व्यक्त केलं. मात्र त्या शब्दांचा अर्थ राशीद खानला कळलाच नाही.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर वॉर्नरने आपल्या पत्नीचं स्केच सोशल मीडियावर शेअर करत तेलगूमध्ये तिच्या बद्दल त्याने कॅप्शनमध्ये प्रेम व्यक्त केलं. वॉर्नरने पोस्ट टाकल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस सुरू झाला.
राशीद खाननं काय केली कमेंट
राशीद खानने हे पाहिल्यानंतर तो मात्र खूपच कन्फ्यूज झाल्याचं पाहायला मिळालं. राशीदने कमेंटमध्ये वॉर्नरला त्याने लिहिलेल्या कॅप्शनचा अर्थ विचारला आणि वॉर्नरला तो राशीला समजवून सांगावा लागला आहे. या दोघांची ही गंम्मत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने त्याचा रिप्लाय हार्ट इमोजीस शेअर करून दिला आहे.