IPL 2021: 19 सप्टेंबरपासून रंगणार सामने, दुसऱ्या टप्प्यात 4 खेळाडू ठरणार गेमचेंजर

वीरेंद्र सेहवागला असं का वाटतंय की हे 4 खेळाडू दुसऱ्या टप्प्यातील गेमचेंजर ठरू शकतात

Updated: Sep 18, 2021, 09:33 PM IST
IPL 2021: 19 सप्टेंबरपासून रंगणार सामने, दुसऱ्या टप्प्यात 4 खेळाडू ठरणार गेमचेंजर

दुबई: कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या सामन्यांची रणधुमाणी पुन्हा 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. चाहत्यांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. आयपीएलचे सामने पुन्हा सुरू होत असल्याने सर्वजण उत्सुक आहेत. टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने चार खेळाडू गेमचेंजर ठरू शकतात असा दावा केला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात हे चार खेळाडू गेमचेंजर ठरू शकतात असा दावा केला आहे. 

वीरेंद्र सेहवागने ईशान किशन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, केएल राहुल यांना यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामासाठी त्यांचे आवडते खेळाडू असल्याचं सांगितलं आहे. हे खेळाडू येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात गेमचेंजर ठरतील असा दावा त्याने केला आहे. 

वीरेंद्र सेहवागने पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, माझी पहिली पसंती ईशान किशन आहे. नंतर देवदत्त पडिक्कल, केएल राहुल आणि संजू सॅमसन आहेत. मी या 4 खेळाडूंवर बारीक नजर ठेवीन. मला देवदत्तची फलंदाजी आवडते. जर मला चारपैकी एकाची निवड करायची असेल तर मी त्याची निवड करेन. आयपीएलच्या दुसरा टप्पा अबुधावीमध्ये होणार आहे. यावेळी मुंबई आणि दिल्ली दोघंही टफ फाईट करणार आहेत. 5 वेळा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सची फलंदाजी फुल फॉर्ममध्ये यावेळी असेल. 

विराट कोहलीवरही वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सेहवाग म्हणाला, प्रत्येकाला वाटतं की विराटच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकावी. विराटचे चाहतेही खूप आहेत. कोरोनामुळे हे वर्ष खूपच आयपीएलसाठी वेगळं राहिलं आहे. त्यामुळे काय सांगावं आयवेळी RCB मागच्या गोष्टी बदलून ट्रॉफीपर्यंत पोहोचेल आणि जिंकेल. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या सामन्यांकडे असणार आहेत.