IPL 2022, Csk vs Kkr | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

कोलकाताने टॉस जिंकला आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreys Iyer) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.

Updated: Mar 26, 2022, 07:22 PM IST
IPL 2022, Csk vs Kkr | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) पहिला सामना हा चेन्नई (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.  कोलकाताने टॉस जिंकला आहे. केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreys Iyer) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या मोसमातील सलामीच्या या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलंय. (ipl 2022 1st match csk vs kkr kolkata knight riders win the toss and elect to fielding first at wankhede stadium mumbai) 

अशी आहे आकडेवारी (CSK vs KKR Head to Head)
 
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नईने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर कोलकाताने 9 मॅचमध्ये चेन्नईला उपट दिली आहे. तर एकमेव उर्वरित सामना हा टाय राहिला. त्यामुळे आकडेवारीनुसार तरी चेन्नईच कोलकातावर वरचढ आहे.  

नव्या कर्णधारांचा कस लागणार

यंदा कोलकाता आणि चेन्नईची धुरा नव्या खेळाडूंची हाती आहे. त्यामुळे कॅप्टन्सी करताना जाडेजा आणि अय्यरच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. यामुळे पहिला सामना जिंकून कोणता संघ विजयी पताका उंचावणार हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत.  

कोलकाता नाईट रायडर्सचे अंतिम 11 खेळाडू - श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

सीएसकेची प्लेइंग इलेव्हन - रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर आणि एडम मिल्न.