IPL 2022 | आयपीएलआधी दिल्लीला मोठा झटका, हा स्टार खेळाडू बाहेर पडणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. 

Updated: Mar 9, 2022, 05:00 PM IST
IPL 2022 | आयपीएलआधी दिल्लीला मोठा झटका, हा स्टार खेळाडू बाहेर पडणार?  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) मोठा झटका लागला आहे. दिल्लीने या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये एकसेएक खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं होतं.  मात्र आता दिल्लीचं टेन्शन वाढलंय. आयपीएलमध्ये वायूवेगाने बॉलिंग करणारा गोलंदाजाला या 15 व्या हंगामाला मुकावं लागू शकतं. त्यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेच वातावरण आहे. (ipl 2022 delhi capitals anrich nortje might missed 15th season due to hip injurey) 

दिल्ली गेल्या 2 मोसमापासून गोलंदाजांवर निर्भर राहिली आहे. अनेक खळाडूंनी भेदक गोलंदाजांच्या जोरावर दिल्लीला विजय मिळवून दिला. एनरिक नॉर्खिया हा दिल्ली टीमचा महत्त्वाचा गोलंदाज आहे.

नॉर्खिया गेल्या 2 वर्षात फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय. नॉर्खियाने वायूवेगाने बॉल टाकत फलंदाजांचा घाम फोडलाय. मात्र नॉर्खिया या 15 व्या मोसमातून बाहेर पडू शकतो, असं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलंय. त्यामुळे दिल्लीचं टेन्शन वाढलंय.     

नॉर्खियाने आयीएलमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7.65 च्या इकोनॉमीने 34 विकेट्स घेतल्या आहेत. नॉर्खियाने 13 व्या मोसमात 22 तर 14 व्या हंगामात 12 विकेट्स घेतल्या होत्या.