मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022 Match 14) आज (6 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कॅप्टन मुंबईकर आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील होणारा सामना पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (ipl 2022 kkr vs mi mumbai indians suryakumar yadav may be play against kolkata)
कोलकाताने या मोसमात खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोर जावं लागलं आहे. त्यामुळे या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहितने मोठी रणनिती खेळली आहे. रोहितने टीममध्ये एका खेळाडूची एन्ट्री केली आहे. त्यामुळे टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे. या खेळाडूमध्ये सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता आहे.
मुंबईने पहिले 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे या सामन्यात 'पलटण'समोर कोलकाताचं आव्हान असणार आहे. मात्र या 2 खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे मुंबई टीमच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
टीममध्ये आक्रमक बॅट्समन सूर्यकुमार यादवची एन्ट्री झाली आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार खेळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
सूर्यकुमारला दुखापतीमुळे मुंबईकडून पहिल्या 2 सामन्यात खेळता आलं नाही. परिणामी मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबईला सूर्याची उणीव भासली.
मात्र आता सूर्या पुनरागमनासाठी सज्ज आहे. या सामन्याआधी सूर्याने नेट्समध्ये कसून सरावही केला. त्यामुळे सूर्याची कोलकाता विरुद्धच्या सामन्यात एन्ट्री निश्चित मानली जात आहे.
वेस्ट इंडिज टीम फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिका खेळवण्यात आली. या मालिकेदरम्यान सूर्याला दुखापत झाली होती. यानंतर सूर्याने बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर मेहनत घेतली. त्या दुखापतीतून सावरला. त्यानंतर सूर्या आयपीएलमध्ये खेळण्यसाठी सज्ज आहे.