IPL 2022 : 25 वर्षांच्या घातक बॉलरकडून RCB टीम उद्ध्वस्त, एकट्याच्या जीवावर जिंकली मॅच

20 लाख रुपयांना घेतलेल्या बॉलरची कोट्यवधींची कामगिरी, एकट्याच्या जीवावर जिंकली मॅच, पाहा कोण हा रिअल हिरो!

Updated: Apr 27, 2022, 01:51 PM IST
IPL 2022 : 25 वर्षांच्या घातक बॉलरकडून RCB टीम उद्ध्वस्त, एकट्याच्या जीवावर जिंकली मॅच title=

मुंबई : बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान टीमनं 29 धावांनी विजय मिळवला. या विजयाचे दोन हिरो ठरले. एक रियान पराग आणि दुसरा म्हणजे 20 लाखांचा खेळाडू. या दोघांच्याही जबरदस्त कामगिरीनं टीमला हा खेळ जिंकण्यात यश मिळालं. 

बंगळुरूच्या छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा राजस्थान टीमनं घेतला. 25 वर्षांच्या एका बॉलरने संपूर्ण टीम उद्ध्वस्त केली. कोट्यवधी रुपयांच्या खेळाडूंना घाम फोडला आणि तंबुतही धाडलं. त्याच्या कामाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. कुलदीप सेनी असं या खेळाडूचं नाव आहे. 

कुलदीप सेनीला ओबेद मॅकॉय ऐवजी खेळण्याची संधी दिली. त्याने या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं केलं आणि टीमला जिंकवून दिलं. 3.3 ओव्हरमध्ये त्याने 20 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. राजस्थानसाठी कुलदीप मॅचविनर ठरला. 

सातवी ओव्हर कुलदीपने टाकली. कुलदीपने फाफ ड्यु प्लेसिसला पॅवेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर ग्लॅन मॅक्सवेलला आऊट केलं. कुलदीपला हॅट्रिक घेता आली नाही. कुलदीपचा हा तिसरा सामना होता. 

जेव्हा जेव्हा संजूला विकेटची आवश्यकता वाटते तेव्हा कुलदीप सेनला बॉलिंगसाठी बोलवलं जातं. फॉफ डु प्लेसिस,  ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा यांची विकेट घेतली आहे. कुलदीप सेनमुळे राजस्थान रॉयल्सला विजय मिळाला आहे.