बंगळूरू : इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सिझनच्या मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. शनिवारी पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. आवेश खान आणि दीपक चहर यांनी कोटींची बोली लागली. लखनऊच्या टीमने आवेश खानला 10 कोटी आणि दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटींमध्ये खरेदी केलं.
आता दुसऱ्या दिवशी इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जोफ्रा आर्चर आणि मार्टिन गप्टिल असे अनेक स्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. सर्व 10 टीम या खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात. दुसऱ्या दिवशी आर्चर, अॅरॉन फिंच आणि ओडिन स्मिथ हे सर्वात जास्त पाहायला मिळणार आहेत.
दुसऱ्या दिवशी या खेळाडूंवर असणार नजर
ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, एस श्रीसंत, पीयूष चावला, जयंत यादव, जयदेव उनादकट, चेतेश्वर पुजारा, शिवम दुबे, विजय शंकर, हनुमा विहारी, मुरली विजय, यश धुल और अर्जुन तेंडूलकर.
जोफ्रा आर्चर, डेविड मलान, साकिब महमूद, एरॉन फिंच, ओएन मोर्गन, जिमी नीशम, टिम साउदी, कॉलिम मुनरो, मार्नस लाबुशेन, लियाम लिवंगस्टोन, ओडीन स्मिथ, डेवॉन कॉन्वे, मार्टिन गुप्टिल, फेबियन एलेन, लुंगी एनगिडी.
पहिल्या दिवशी एकूण 97 खेळाडूंनी बाजी मारली. यामध्ये सर्व 10 टीम्सने मिळून 20 परदेशी खेळाडूंसह 74 खेळाडूंना खरेदी केलं. 23 खेळाडू असे होते ज्यांना एकही खरेदीदार मिळाला नाही. पहिल्या दिवशी सर्व संघांनी एकूण 388 कोटी 10 लाख रुपये खर्च केले.