मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदाचं आयपीएल जरा खास आणि वेगळं असणार आहे. 10 संघ नव्या फॉरमॅटमध्ये या वर्षी आयपीएलचे सामने खेळणार आहेत. यंदा लखनऊ आणि गुजरात दोन नवीन संघही आले आहेत.
या वर्षी नवे संघ आणि काही नवीन नियम तर काही बदलेले नियम अशा स्वरुपात नव्या जोमात आयपीएलचे सामने होणार आहेत. डीएसआरपासून ते क्रिकेटपटूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यास खेळाचे नियम कसे असतील याबाबत नवीन नियमावली BCCI ने जारी केली आहे.
बीसीसीआयने आयवेळी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबई आणि पुण्यात आयपीएलच्या सामन्याचं आयोजन केलं आहे. मुंबईतील 3 आणि पुण्यातील एका स्टेडियमवर सामने खेळवले जाणार आहे. क्रिकबजने दिलेल्या रिपोर्टनुसार कोरोनासाठी काही नियमांमध्ये बदल केले आहेत.
जर एखाद्या खेळाडूला कोरोना झाला आणि टीममधील 12 खेळाडूंपैकी जर 7 खेळाडू भारतीय असतील आणि एक सब्सटिट्यूट असेल तर ती टीम मैदानात उतरू शकणार नाही. अशावेळी ती मॅच पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न BCCI करणार आहे. जर ते शक्य नसेल तर IPL टेक्निकल कमिटीजवळ हा प्रस्ताव पाठवण्यात येईल त्यानंतर अंतिम निर्णय होईल.
त्यावेळी जर मॅच खेळवणं शक्य नसेल तर अशा परिस्थितीमध्ये ज्या टीममध्ये खेळाडू कमी आहेत ती टीम पराभूत धरली जाईल. तर विरोधी टीमला 2 गुण जास्त मिळतील.
DSR च्या नियमातही बदल करण्यात आला आहे. प्रत्येक डावात एका ऐवजी दोन रिव्ह्यू घेता येणार आहे. जर एखादा फलंदाज कॅट आऊट झाला तर बदलेल्या स्ट्राइकला गृहित धरलं जाणार नाही. नवा फलंदाज क्रिझवर येईल. पण कॅच जर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर घेतला असेल तर स्ट्राइक बदलेली गृहित धरली जाणार आहे.
एवढेच नाही तर आता प्लेऑफ आणि फायनलमधील टाय ब्रेकरच्या नियमही बदल करण्यात आला आहे. जर प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात, सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर नसेल किंवा एका सुपर ओव्हरनंतर सुपर ओव्हर आवश्यक नसेल तर, लीग स्टेजमधील दोन्ही संघांच्या स्थानांवर आधारित विजेता निश्चित केला जाईल.