मुंबई : आयपीएलमध्ये उद्या (29 मे रोजी) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यापुर्वी अनेक दावे केले जात आहेत. या ग्रँड फायनल आधी 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैनाने कोणत्या संघाचा वरचष्मा असेल याबाबत वक्तव्य केलंय. शिवाय दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू ग्रॅमी स्मिथनेही आपलं मत मांडलंय.
माजी खेळाडूंचा दावा
ग्रॅमी स्मिथ आणि सुरेश रैना या दोघांना वाटते की, राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सवर थोडीशी आघाडी मिळवू शकते, कारण राजस्थान संघाने याआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला आहे. त्यामुळे या मैदानात कसे खेळायचे आहे. हे राजस्थानला माहितीय.
ग्रॅमी स्मिथचा दावा काय ?
राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सपेक्षा थोडीशी आघाडी घेईल. त्यांनी या मैदानावर आधी सामना खेळला आहे. त्यांना या मैदानाचे वातावरण, आऊटफिल्ड, खेळपट्टी आणि अतिरिक्त बाऊन्सची माहिती झाली आहे.
सुरेश रैनाचा दावा काय ?
'गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सवर थोडीशी आघाडी मिळेल, कारण त्यांना चार-पाच दिवस चांगली विश्रांती मिळाली आहे. तो पुढे म्हणाला, 'मला विश्वास आहे की राजस्थानला हलक्यात घेतले जाणार नाही, कारण तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि जर जोस बटलरने शेवटच्या सामन्यात स्फोटक खेळी केली तर तो संघासाठी खूप मोठा बोनस असेल. त्यामुळे हा मोठा सामना असणार आहे.
दरम्यान या दोन्ही माजी क्रिकेटपटूंचे दावे किती खरे ठरतात हे उद्याच्या सामन्यानंतर कळणार आहे.