Dhoni Six Video: धोनीनं गुजरातच्या गोलंदाजाला उत्तुंग Six मारल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काय घडलं पाहा

MS Dhoni Hit Six Video Goes Viral: चेन्नईच्या संघाची सहावी विकेट पडल्यानंतर गुजरातच्या चाहत्यांपेक्षा चेन्नईच्या चाहत्यांनीच जास्त जल्लोष केला. हा क्षणही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Updated: Mar 31, 2023, 10:03 PM IST
Dhoni Six Video: धोनीनं गुजरातच्या गोलंदाजाला उत्तुंग Six मारल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काय घडलं पाहा
Dhoni Hit Huge Six

MS Dhoni Six Video: इंडियन प्रिमियर लिगच्या यंदाच्या सिझनमधील (IPL 2022) पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सविरुद्धच्या (Gujarat Giants) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) संघाने 178 धावा केल्या आहेत. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने तुफान फटकेबाजी केली. तर शेवटच्या षटकामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने दोन उत्तम फटके लगावत चाहत्यांची मनं जिंकली. धोनीने आधी एक उत्तुंग षटकार लगावला आणि त्यानंतर लेग साईडला चौकार मारला. धोनीने षटकार लगावताच गुजरातच्या होम ग्राऊण्डवर उपस्थित जवळजवळ सर्वच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 

धोनी बॅटिंगसाठी जागेवर उभा राहिला अन्...

सामन्यातील 18 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 153 वर असताना रविंद्र जडेजा बॉण्ड्रीवर झेलबाद झाला. जडेजाच्या रुपाने चेन्नईचा सहावा फलंदाज तंबूत परतला. मात्र चेन्नईच्या संघाची ही विकेट पडल्यानंतर चेन्नईच्याच चाहत्यांनी मोठा जल्लोष केल्याचं उलटं चित्र मैदानात पहायला मिळालं. चेन्नईच्या चाहत्यांनी आपला खेळाडू बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन करण्याचं कारण ठरला महेंद्र सिंग धोनी! जडेजा बाद झाल्यानंतर डगआऊटमध्ये पॅड आणि हेल्मेट घालून बसलेला धोनी फलंदाजीसाठी बॅट हातात घेऊन उभा राहिला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धोनीचा षटकार अन् जल्लोष...

सामनाच्या शेवटच्या षटकामध्ये आयर्लंडचा वेगवान जोशुआ लिटीलच्या गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने लेग साईडला उत्तुंग षटकार लगावला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या फलंदाजीची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे. याचाच प्रत्यय त्याने लगावलेल्या या षटकारानंतर आला. पुढच्याच चेंडूवर धोनीने लेग साईडलाच एक चौकार लगावला. धोनीने या खेळीमध्ये 7 चेंडूमध्ये नाबाद 14 धावा केल्या.

1)

2)

3)

4)

ऋतुराजचे 9 षटकार

दरम्यान, या सामन्यामध्ये ऋतुराजने तुफान फटकेबाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मोलाचं योगदान दिलं. ऋतुराज 92 धावांवर बाद झाला. ऋतुराजने 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अवघ्या 50 चेंडूंमध्ये या 92 धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज़

'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी...' बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता

'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझी परी...' बीडच्या तरुणाने दिला थेट घरचा पत्ता

Bus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Bus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

"मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे....", तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा

"मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे....", तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; 'या' आमदारांचे मंत्रीपदाचं स्वप्न होणार साकार

Balu Dhanorkar: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Balu Dhanorkar: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

IPL 2023 Final : इतिहासात पहिल्यांदाच 'रिझर्व्ह डे'ला रंगणार फायनल सामना; 'ही' असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11

IPL 2023 Final : इतिहासात पहिल्यांदाच 'रिझर्व्ह डे'ला रंगणार फायनल सामना; 'ही' असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11

IPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ

IPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ

लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं, जावयाच्या दारातच रचलं सरण

लेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं, जावयाच्या दारातच रचलं सरण

इतर बातम्या

'गौतमी तुझ्या सर्व इच्छा-अटी मान्य, बोल तू होती का माझ...

महाराष्ट्र