IPL 2023 : आयपीएलमध्ये शुक्रवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना इंदूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) रंगणार आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) सध्या पॉईंट्स टेबलमध्ये (IPL points Table) टॉपवर आहे तर चौथ्या क्रमांकावर राजस्थानची टीम आहे. पुन्हा एकदा पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावण्यासाठी संजू सॅमसन (Sanju Samson) पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी दोन्ही टीम्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे जाणून घेऊया.
राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीममध्ये अनेक महत्त्वाचे खेळाडू आहेत. मात्र तरीही एकूण नऊ सामन्यांमध्ये राजस्थानला (Rajasthan Royals) 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या टीममध्ये गोलंदाजांची मोठी समस्या आहे. गेल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 2012 रन्सचं मोठं लक्ष्य रोखण्यात टीमला अपयश आलं होतं. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, युझवेंद्र चहल आणि कुलदीप सेन हे गोलंदाज गेल्या सामन्यात फार महागाडे ठरले होते.
तर दुसरीकडे राजस्थानच्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमतरता दिसून येत नाही. ओपनर यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर राजस्थानसाठी चांगली ओपनिंग करतात. याशिवाय अधिक रन्सची जबाबदारी कर्णधार संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर आणि देवदत्त पडीक्कलवर असणार आहे.
हा सामना जिंकायचा असेल तर शुभमन गिलला ओपनिंग चांगली करून द्यावी लागणार आहे. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात शुभमनला (Shubman gill) मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी करणं अपेक्षित आहेत. दुसरीकडे डेविड मिलरला दिल्लीविरूद्ध भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे डेविड मिलर, कर्णधार हार्दिक पंड्या, विजय शंकर आणि राहुल तेवातिया या फलंदाजांची बॅट तळपणं महत्त्वाचं आहे.
संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, आर अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा
ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, जोशुआ लिटिल, मोहम्मद शमी