IPL 2023: मंदिरा बेदीने उद्घाटन सोहळ्यात दोन घड्याळं का घातली होती? व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित

IPL 2023 Mandira Bedi: आयपीएलच्या 16 (Indian Premiere League) व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यात मंदिरा बेदीने (Mandira Bedi) समालोचन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र यावेळी सर्वाधिक चर्चा रंगली ती तिने घातलेल्या घड्याळाची. याचं कारण तिने दोन्ही हातात घड्य़ाल घातलं होतं.   

Updated: Apr 1, 2023, 04:18 PM IST
IPL 2023: मंदिरा बेदीने उद्घाटन सोहळ्यात दोन घड्याळं का घातली होती? व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित title=

IPL 2023 Mandira Bedi: बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हे नाव क्रिकेटमध्येही तितकंच प्रसिद्ध आहे. मंदिरा बेदीने क्रिकेटंचं अँकरिंग केल्याने ती चांगलीच प्रसिद्धीस आली होती. अँकरिंग केल्यानंतर तिला टीका तसंच कौतुक अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आयपीएलच्या निमित्ताने मंदिरा बेदी पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला आली आहे. आयपीएलच्या (IPL) उद्धाटन सोहळ्यात मंदिरा बेदी होस्ट होती. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या उद्धाटन सोहळ्यात मंदिरा बेदी उपस्थित होती. मात्र यावेळी तिच्यापेक्षाही जास्त चर्चा ही तिने घातलेल्या घड्याळाची होती. याचं कारण म्हणजे मंदिरा बेदीने एक नव्हे तर चक्क दोन घड्याळं घातलेली होती. 

मंदिरा बेदीने आयपीएलच्या मंचावर दोन हातात घड्याळं घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा काहीजण परदेशातील वेळही समजावी यासाठी दोन घड्याळं घालत असतात. पण यावेळी आयपीएल भारतात होत असतानाही मंदिरा बेदीने दोन घड्याळं का घातली असावीत अशी शंका उपस्थित होत आहे. 

एका युजरने ट्विटरला मंदिरा बेदीचा मंचावरुन होस्ट करत असतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या दोन्ही हातात घड्याळ दिसत आहे. "मंदिरा बेदी फिट दिसतीये! पण दोन घड्य़ाळं का घातली आहेत? काय कारण? TATAIPL2023", असं या युजरने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पोस्टला 5 हजारांहून अधिक जणांनी पाहिलं आहे. 

मंदिराने आता दोन घड्याळं घालण्यामागे नेमकं काय कारण होतं हे तर गुलदस्त्यात आहे. मात्र मंदिराने बऱ्याच दिवसांनी क्रिकेटच्या मंचावर पुनरागमन केल्याने चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना पार पडला. उद्घाटन सोहळ्यात अरिजित सिंग, तमन्ना भाटिया, रश्मिका आणि इतर कलाकारांनी परफॉर्म केलं. हा सोहळा डोळे दिपवणारा होता. 

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईचा पराभव करत विजयी सुरुवात केली. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपरकिंग्जने गुजरातसमोर 179 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 30 रन्स जिंकण्यासाठी हवे होते. दरम्यान कडवी झुंज देत गुजरातने हा सामना जिंकला.