IPL 2023 PBKS vs RCB: मोहालीत (Mohali Cricket Stadium) होणाऱ्या आयपीएल 2023 चा (IPL 2023) 27 वा सामना आज (20 एप्रिल) दुपारी पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) असा खेळवला जाणार आहे. गेल्या सामन्यात चेन्नईकडून (CSK) पराभव झाल्यानंतर आरसीबीचा संघ विजयासाठी प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जायट्ंसला (LSG) पराभूव करुन पंजाब किंग्सचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे याच आत्मविश्वासासह आरसीबीच्या संघाचा पराभव करण्यासाठी ते घरच्या मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये जोरदार सामना होण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आजचा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे होणार आहे. दुपारी 3:30 वाजता सुरू होणार असून दुपारी 3:00 वाजता टॉस होईल. सध्या टॉप-4 च्या शर्यतीतून हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर दुसरीकडे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेले विराट कोहली, फाफ डुप्लेसी आणि शिखर धवन दमदार खेळी खेळण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आरसीबीकडून विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयासह आयपीएल 2023 ची सुरुवात केली होती. मात्र विजयाचे सातत्य राखण्यात आरसीबीच्या संघाला अपयश आले. बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. 4 गुणांसह आरसीबी गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची आतापर्यंतची कामगिरी सरासरीची आहे. पंजाब किंग्सने गेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा 2 गडी राखून पराभव केला होता. पंजाबने 5 पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ 6 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
संघात बदल होण्याची शक्यता
गेल्या सामन्यात दुखापतीमुळे कर्णधार शिखर धवन खेळू शकला नव्हता. मात्र आरसीबीविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोन देखील संघात परतला आहे. तर आरसीबीच्या संघात जोश हेजलवुडच्या रूपाने त्यांच्या संघात बदल पाहायला मिळतो. हेझलवूडही काही काळापासून दुखापतीने त्रस्त होता, मात्र आता तो संघात सामील झाला आहे. त्यामुळे तो आज संघात पुनरागमन करू शकतो. हेझलवूडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास वेन पारनेलला वगळावे लागेल.
कुठे पाहाल सामना?
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. यासोबत JIO CINEMA अॅप असणाऱ्या युजर्सना देखील थेट त्यांच्या मोबाईलवर हा सामना पाहता येणार आहे.
IPL 2023 साठी पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ
शिखर धवन (क.), मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, भानुका राजपक्षे, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), सिकंदर रझा, सॅम करण, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग, राज बावा, नॅथन एलिस, बलतेज सिंग, जितेश शर्मा, अथर्व तायडे, विद्वत कवेरप्पा, मोहित राठी आणि शिवम सिंग.
IPL 2023 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (क.), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, विजयकुमार वैशाक, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, आकाश दीप, कर्णधार शर्मा, अनुज रावत, मनोज भांडगे, मायकेल ब्रेसवेल, फिन ऍलन, सिद्धार्थ कौल, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा आणि सोनू यादव.
पंजाब किंग्जची संभाव्य प्लेईंग 11
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम करण, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेईंग 11
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, विजयकुमार वैशाक आणि मोहम्मद सिराज.