IPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल

IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Updated: Mar 23, 2023, 01:37 PM IST
IPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल

IPL 2023 Rules Change : अवघ्या काही दिवसांमध्ये आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. दरम्यान आयपीएल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना एक नवा नियम (Rules Change) लागू होणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच बदल पहायला मिळतायत. त्यामध्येच आता हा नवा नियम लागू होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा नियम येणार आहे. 

आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. जर बीसीसीआयने याची घोषणा केली तर, कर्णधार टॉस दरम्यान मैदानावर उतरतील तेव्हा त्यांच्या हातात एक नव्हे तर दोन कागद असणार आहेत. हा नियम नेमका काय असणार आहे तो पाहुया.

टॉसनंतर होणार प्लेईंग 11 मध्ये बदल

या नव्या नियमानुसार, आयपीएल 2023 साठी जेव्हा दोन्ही कर्णधार टॉससाठी मैदानात येतील त्यानंतर ते प्लईंग 11 ची घोषणा करू शकतील. याचाच अर्थ टॉसनंतर चाहत्यांना टीमची प्लेईंग 11 समजू शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार टॉसच्या वेळी दोन कागद आणतील. यावेळी टॉस जिंकल्यास आणि हरल्यास तो प्लेईंग 11 मध्ये बदल करू शकतो. 

क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, टॉस झाल्यानंतरही टीमना त्यांची प्लेइंग इलेव्हन निवडण्याची संधी मिळणार आहे. याप्रमाणे टॉस जिंकणारे आणि हरणारे कर्णधार टॉसनंतर सांगू शकतील की, सामन्यात त्यांना त्यांच्या टीममध्ये कोणते 11 खेळाडू खेळवायचे आहेत.

आतापर्यंत कर्णधारांना त्यांच्या प्लेईंग 11 ती यादी टॉस होण्यापूर्वी द्यावी लागते. आता टॉस झाल्यानंतर प्लेइंग इलेव्हनची यादी एकमेकांच्या कर्णधारांकडे सोपवावी लागणार आहे. असा नियम SAT T20 लीगमध्ये लागू कऱण्यात आला होता.

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स विजेती टीम

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स विजेती टीम ठरली होती. या टीमने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा आयपीएलचा पहिला सामना खेळण्याचा मान हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला मिळाला आहे. तर राजस्थानचा संघ 2 एप्रिलला आपला पहिला सामना सनरायर्स हैदराबादबरोबर खेळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज़

Cyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी

Cyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी

ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रात 'या' ठिकाणी रंगणार मद्यपींचं संमेलन; उत्साह शिगेला

ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रात 'या' ठिकाणी रंगणार मद्यपींचं संमेलन; उत्साह शिगेला

नागपुरात निवृत्त पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू; घराच्याच विहीरीत आढळला दगड बांधलेला मृतदेह

नागपुरात निवृत्त पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू; घराच्याच विहीरीत आढळला दगड बांधलेला मृतदेह

Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचं अमरावती कनेक्शन, धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता?

Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचं अमरावती कनेक्शन, धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता?

"लवकरच तुमचा दाभोलकर होईल"; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

"लवकरच तुमचा दाभोलकर होईल"; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

औरंगजेब याच मातीतला, मग फोटो लावले तर काय फरक पडतो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप

'जेव्हा शरद पवार विरोधी पक्षात, तेव्हा राज्यात दंगली..' भाजप नेत्याचा गंभीर आरोप

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट

Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट

इतर बातम्या

Pandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान...

आषाढी एकादशी