IPL 2024 MI vs CSK : आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान झालेला सामना क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 20 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या या विजयात महत्त्वाच्या भूमिका ठरली ती महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni). डावाच्या शेवटच्या षटकात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एमएस धोनीने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार ठोकले. तर शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत चार चेंडूत वीस धावा केल्या. चेन्नईच्या विजयात याच 20 धावा निर्णायक ठरल्या.
धोनीच्या फलंदाजीचे चाहते
एमएस धोनीच्या या फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आयपीएलमध्ये धोनी कोणत्याही मैदानावर खेळत असला तरी होम टीमपेक्षा धोनीचे चाहते मोठ्या संख्येने असतात. धोनी मैदानावर उतरताच त्याच्या जयघोषाने संपूर्ण मैदान दणाणून जातं. सामान्य चाहत्यांबरोबर बॉलिवूड आणि उद्योगपतीही धोनीचे फॅन्स आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने तर आपण माहिचे खूप मोठे फॅन असल्याचं म्हटलं आहे. धोनीच्या चाहत्यांमध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. देशातल्या एका बड्या उद्योगपतीने मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनीने ठोकलेल्या षटकारांचं कौतुक केलं आहे. आपल्या नावावतही माहि आहे, याचा गर्व वाटतो असं या उद्योगपतीने म्हटलं आहे.
महेंद्रसिंग धोनीचं कौतुक
महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी धोनीच्या षटकारांचं कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. अनेकवेळा प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करत ते लोकांचं कौतुक करताना दिसतात. यावेळी त्यांनी महेंद्रसिंग धोनीचं कौतुक केलं आहे. दबावातही उत्तम कामगिरी करण्याच्या धोनीच्या क्षमतेचं त्यांनी कौतुक केलं आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनीच्या खेळीने आनंद महिंद्रा थक्क झाले होते. सध्याच्या काळात असा एकही खेळाडू नाही जो संघाच्या कठिण काळात मैदानात उतरत स्वत:ला सिद्ध करुन दाखवतो.
धोनीचं कौतुक करताना आनंद महिंद्रा यांनी, आपल्याला गर्व आहे की माझं नाव Mahi-ndra आहे, असं म्हटलं. महिंद्र ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा यांचं नेटवर्थ जवळपास 25 हजार कोटी रुपये इतकं आहे.
एमएस धोनीचा विक्रम
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनी वीसाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फलंदाजीला आला. येताच त्याने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारले. या खेळीने धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिलाच. पण त्याचबरोबर दोन मोठे विक्रमही नावावर केले. आयपीएलमध्ये धोनीचा चेन्नईसाठी तब्बल 250 वा सामना होता. याशिवाय त्याने टी20 5000 हहजार धावांचा टप्पाही पार केला. टी20 क्रिकेटमध्ये धोनीने आतापर्यंत 64 षटकार लगावलेत.