RR vs RCB Eliminator : राजस्थान वाजवणार विजयाचे नगाडे की आरसीबी घेणार बदला? पाहा हेड टू हेड

IPL 2024, RR vs RCB Eliminator : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना असेल.

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 11:45 PM IST
RR vs RCB Eliminator : राजस्थान वाजवणार विजयाचे नगाडे की आरसीबी घेणार बदला? पाहा हेड टू हेड title=
IPL 2024 Eliminator RR vs RCB head to head records and possible playing XI

Rajasthan Royals Vs Royal Challengers Bengaluru : पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने तगड्या हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केलाय. त्यामुळे केकेआर फायनलमध्ये गेली आहे. अशातच आता सर्वांचं लक्ष लागलंय. एलिमिनेटर सामन्याकडे... एलिमिनेटर सामन्यात आरआर आणि आरसीबी यांच्यात तगडी फाईट पहायला मिळणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 6 धावांनी पराभव केला होता. 6 एप्रिल रोजी हा सामना खेळवला गेला होता. त्यामुळे आता आरसीबी बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

RR vs RCB हेड टू हेड

आयपीएल स्पर्धांमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यातील 13 सामने जिंकलेत तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 15 वेळा विजयावर शिक्कामोर्तब केलाय. त्याचबरोबर तीन सामने ड्रॉ झाले. एवढंच नाही तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात राजस्थान आणि बंगळुरू दोघांनीही प्रत्येकी एक गेम जिंकला आहे.

राजस्थानसाठी विजय महत्त्वाचा

गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात राजस्थानला पराभव पत्कारावा लागलाय. तर मागील केकेआरविरुद्धचा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे राजस्थानवर एलिमिनेटर खेळण्याची नामुश्की आली. मात्र, सामना हरला तर बाहेरचा रस्ता.. याची पुर्ण कल्पना संजू सॅमसनला असणार आहे. त्यामुळे आता राजस्थानला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे.

आरसीबीसाठी मोठी संधी

केवळ 1 टक्के प्लेऑफची संधी असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धमाकेदार कामगिरी केली अन् प्लेऑफमध्ये धडक मारून दाखवली. आरसीबीच्या कामगिरीमुळे आता फॅन्सच्या इच्छाशक्तीला बळ मिळालंय. अशातच आता आरसीबीला चाहत्यांचा हिरमोड करायचा नसेल तर उद्याचा सामना जिंकावा लागेल. आरसीबीसाठी विराट कोहली हुकमी एक्का राहिल.

राजस्थानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल.

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), यश दयाल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (WK), महिपाल लोमर.