Mumbai Indians Jersey For IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी राहिलाय. येत्या 22 मार्चला आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सर्व दहा संघ नव्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) सहाव्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या नव्या हंगामासाठी नवी जर्सी (MI New Jersey) लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सचा नवा व्हिडिओ
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला आहे. गेली अनेक वर्ष संघाची कमान सांभाळणाऱ्या रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) मुंबईत इंडियन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. मुंबई इंजियन्सने गुजरात टायटन्सबरोबर ट्रेड करत हार्दिकला आपल्या संघात घेतलं, त्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याच्या मुंबईचा कर्णधार असल्याची घोषणा करण्यात आली. आता कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स प्रत्येक व्हिडिओत, जाहीरातीत, पोस्टरवर सर्वात पुढे दिसायला हवाय. पण नव्या जर्सीच्या लॉन्चिंग व्हिडिओत असं झालेलं नाही.
मुंबई इंडियन्से सोशल मीडियावर नव्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. याचा व्हिडिओ मुंबईने सोशल मीडियावर शेअर केल आहे. या व्हिडिओ नव्या जर्सीची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. पण व्हिडिओच्या सुरुवाताली नवी जर्सी परिधान करुन कर्णधार हार्दिक दिसण्याऐवजी रोहित शर्मा पाहायला मिळतोय. त्यानंतर सूर्यकुमार यादव, ईशान किशन, जसप्रीत बुमराह हे खेळाडू दिसतायत. तर कर्णधार हार्दिक पांड्या व्हिडिओत आठव्या क्रमांकावर आहे.
असा व्हिडिओ बनवण्यामागे मुंबई इंडियन्सला काय सूचवायचं आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. पण कोणत्याही संघाच्या व्हिडिओत पहिलं कर्णधाराला दाखवण्यात येतं. त्यामुळे या व्हिडिओवरुन मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
#OneFamily #MumbaiIndians @skechersGOin pic.twitter.com/onpVgJqMZ4
— Mumbai Indians (@mipaltan) March 13, 2024
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईचे पाच विजय
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स तब्बल पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. यानंतरही नव्या हंगामात त्याच्याकडून कर्णधारपद काढण्यात आलं. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई इंडियन्सचे सामने कधी आहेत?
मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स - 24 मार्च 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद - 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
मुंबई इंडियन्सचा संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्य कुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमराह, एन. तिलक वर्मा, गेराल्ड कोएत्जी, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, नेहल वढेरा, पियुष चावला, रोमॅरियो शेफर्ड, शॅम्स मुलानी, , टिम डेव्हिड, विष्णू विनोद, नुवान तुषारा, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, शिवालीक शर्मा
Mumbai Indians Players : Akash Madhwal, Arjun Tendulkar, Dewald Brevis, Ishan Kishan, Jason Behrendorff, Jasprit Bumrah, Kumar Kartikeya Singh, N. Tilak Varma, Nehal Wadhera, Piyush Chawla, Rohit Sharma, Romario Shepherd (T), Shams Mulani, Surya Kumar Yadav, Tim David, Vishnu Vinod, Hardik Pandya (C), Gerald Coetzee, Nuwan Thushara, Dilshan Madushanka, Mohammad Nabi,Shreyas Gopal, Naman Dhir, Anshul Kamboj,Shivalik Sharma