IPL 2024: आयपीएल फायनलची तारीख ठरली, 'या' मैदानावर रंगणार सामना

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाची फायनल चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे.

राजीव कासले | Updated: Mar 25, 2024, 03:23 PM IST
IPL 2024: आयपीएल फायनलची तारीख ठरली, 'या' मैदानावर रंगणार सामना title=

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात झालीय आणि आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्स (RR), चेन्नई सुपर किंग्स (CSK), पंजाब किंग्स (PBKS), गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाईट रायडर्सने (KRR) विजयी सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळपत्रक जवळपास निश्चित केलंय, लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. 

या मैदानावर प्ले ऑफचे सामने
आयपीएल 2024 वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा अंतिम सामना (IPL 2024 Final) 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर(Chidambaram Stadium) खेळवला जाणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरचे सामने आयोजित केले जातील. तर क्वालिफायरचा दुसरा सामना चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर रंगणार आहे. 

ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या  क्रमांकावर असणाऱ्या संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. क्वालिफायर-1 मध्ये हरणारा संघ आणि एलिमिनेटरमधला विजेता संघ क्वालिफाय-2 सामना होईल. यातला क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधले विजेता संघ आयपीएलचा अंतिम सामना खेळतील. 

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार गतविजेत्या संघाच्या होम ग्राऊंडमध्ये सलामीचा सामना आणि अंतिम सामना खेळवण्याची परंपरा आहे. यावेळीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिला आणि अंतिम सामना खेळवण्यात आला होता. कारण 2022 मधये गुजरा टायटन्स चॅम्पियन संघ ठरला होता. 

या हंगामात किती सामने
आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा गेला हंगाम 60 दिवस चालला होता. आयपीएलच्या ग्रुपमध्ये प्रत्येक सामन्यात विजेता ठरणाऱ्या संघाला 2 गुण दिले जातील. तर हरणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही. कोणत्या कारणाने सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात येईल. ग्रुपनंतर प्लेऑफचे सामने होतील. 

IPL 2024 वेळापत्रक
२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ