IPL 2025 पूर्वी काव्या मारनच्या टीमला धक्का, वर्ल्ड क्लास बॉलरने सोडली साथ

Kavya Maran: IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी  संघांमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत आहेत. आता काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीममध्ये एक बदल झाला आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 17, 2024, 07:56 PM IST
IPL 2025 पूर्वी काव्या मारनच्या टीमला धक्का, वर्ल्ड क्लास बॉलरने सोडली साथ  title=

Sunrisers Hyderabad: IPL 2025 चा मेगा लिलाव लवकरच पार पडणार आहे. आयपीएल ही सार्वधिच गाजली गेलेली सिरीज आहे. पुढील सिजनच्या आधी लिलावापूर्वी अनेक संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल होत आहेत. काव्या मारनच्या टीम सनरायझर्स हैदराबादमधेही बदल होत आहेत. दिग्गज दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन येत्या हंगामात हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणार नसल्याचे जाहीर केले आहे. 

कधीपासून होता गोलंदाजी प्रशिक्षक?

डेल स्टेनने 2022 च्या सीजनपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक ही भूमिका स्वीकारली. परंतु, वैयक्तिक कारणांमुळे तो 2024 च्या हंगामात या संघाचा भाग नव्हता. त्यावेळी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स फ्रँकलिनने त्याची जागा घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून डेल स्टेनने एक पोस्ट केली होती. स्टेन म्हणाला, 'आयपीएलमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मी जी काही वर्षे घालवली त्याबद्दल सनरायझर्स हैदराबादचे खूप खूप आभार. दुर्दैवाने, मी 2025 मध्ये आयपीएलसाठी उपलब्ध असणार नाही. मात्र, मी दक्षिण आफ्रिकेत सनरायझर्स इस्टर्न केपसाठी काम करत राहीन. सलग तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.' 

आता कोणावर असेल जबाबदारी?

डेल स्टेनच्या अनुपस्थितीत, हैदराबादने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू जेम्स फ्रँकलिनला आयपीएल 2024 मध्ये मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांच्यासोबत काम करण्यासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. 

आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द 

दक्षिण आफ्रिकेसाठी 93 कसोटी, 125 एकदिवसीय सामने आणि 47 टी-20 सामने खेळण्याव्यतिरिक्त, स्टेन डेक्कन चार्जर्स  आरसीबी, सनरायझर्स आणि गुजरात लायन्ससाठीही खेळला. 95 आयपीएल सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आणि एकूण 97 बळी घेतले. आयपीएलमध्ये एसआरएचचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणे हाही त्याचा पहिला क्रिकेट कोचिंग होता. वेगवान गोलंदाज उमरान मलिकची गोलंदाजी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे श्रेय स्टेनला जाते.