Rishabh Pant: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाला पाठोपाठ विकेट्स गेल्याने धक्का बसला होता त्यातच नंतर ऋषभ पंतला दुखापत झाल्याने मैदाना बाहेर जावं लागले. फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला एवढ्या जोरात दुखापत झालं की त्यामुळे त्याला सामन्याच्या मध्येच मैदान सोडावे लागले. मैदान सोडताना त्याला स्पोर्ट स्टाफची मदत घ्यावी लागली. ऋषभ पंतला सरळ उभे राहण्यातही अडचण येत आहे.
ऋषभ पंत विकेट कीपिंग करताना रवींद्र जडेजाचा चेंडू त्याला लागला. 37व्या षटकातील शेवटचा चेंडू खूप वेगाने फिरला. डेव्हॉन कॉनवेकडून तो चेंडू चुकला आणि चेंडू ऑफ स्टंपजवळ गेला. तिकडून चेंडू पंतच्या गुडघ्याजवळ आदळला. यानंतर तो वेदनेने ओरडला. तो जमिनीवर आडवा झाला. फिजिओने येऊन त्याला तपासले आणि स्प्रे लावला पण त्याचा त्रास कमी होताना दिसत नव्हता. यानंतर त्याला मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले.
Rishabh Pant down with knee issues. pic.twitter.com/uxrY5ciePO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2024
ऋषभ पंतच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढवले आहे. 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पंत दुखापतीतून परतला होता. मात्र अवघ्या 3 महिन्यांनंतर पंतबाबत टीम इंडियाचा तणाव वाढला आहे. भारताला पुढील महिन्यात कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे जेथे पंत संघाचे ट्रम्प कार्ड ठरू शकतो. आता पंत किती काळ मैदानापासून दूर राहतो हे पाहावे लागेल.
Get well soon, Rishabh Pant! pic.twitter.com/RQ0xOHgsLt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 17, 2024
ऋषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये मोठा कार अपघात झाला होता. तो तेव्हा स्वतः दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घराकडे गाडी चालवत जात होता. या अपघातात पंत खूप गंभीर जखमी झाला होता. या काळात त्याच्या उजव्या गुडघ्याला सर्वात मोठी दुखापत झाली होती. बराच वेळ तो क्रॅचच्या सहाय्याने चालत होता. आता पुन्हा एकदा त्याच गुडघ्याला चेंडू लागला आहे.