IPL प्रकरणात वडील आहेत 'फरार', आता मुलाने खरेदी केली आलिशान कार

आता पुन्हा एकदा रुचिर चर्चेत आला आहे आणि ते म्हणजे त्याने पोस्ट केलेल्या फोटोजमुळे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 29, 2018, 06:25 PM IST
IPL प्रकरणात वडील आहेत 'फरार', आता मुलाने खरेदी केली आलिशान कार title=

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांचा मुलगा रुचिर मोदी हा आपल्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. केवळ भारतातच नाही तर लंडनमध्येही त्याची चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा रुचिर चर्चेत आला आहे आणि ते म्हणजे त्याने पोस्ट केलेल्या फोटोजमुळे.

रुचिर मोदीने एक नवी आलिशान कार खरेदी केली आहे. या कारचे फोटोज रुचिरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

मुलाने पोस्ट केलेल्या फोटोवर ललित मोदी यांनीही पोस्ट केलं आहे. ललित मोदींनी म्हटलं आहे की, "Love my sons new car". यानंतर युजर्सनेही यावर कमेंट्स करणं सुरु केलं आहे.

आयपीएलमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ललित मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची अफरातफर प्रकरणी ललित मोदी आरोपी असून ते फरार आहेत.

आलिशान गाड्यांचं कलेक्शन 

  • ललित मोदींकडे अनेक अलिशान आणि महागड्या कार आहेत. रुचिरही या कारमध्ये पहायला मिळतो. त्यांच्याकडे लंडनमध्ये एक फरारी कार आहे ज्याच्या नंबरप्लेटवर क्रिकेट लिहीलं आहे.

Indian Premier League, IPL, Lalit Modi, Latest IPL news, Lalit Modi IPL

  • काही दिवसांपूर्वीच रुचिरने McLaren 720S कार खरेदी केली आहे. त्याचा फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक कमेंट्स येत आहेत.
  • ललित मोदी यांनीही काही वर्षांपूर्वी आपली पत्नी मिनलला अॅस्टन मार्टिन कार गिफ्ट दिली होती. यासोबतच ललित मोदींकडे मर्सडिज बेंज जी 63 एएमजी आणि इतरही आलिशान कार आहेत.
  • आयपीएलमध्ये अनेक सेलिब्रेटींसोबत रुचिर पहायला मिळाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत रुचिर खूप बदलला आहे.
  • २००८ ते २०१० या कालावधीत आयपीएल मॅचेसमध्ये दिसणारा रुचिर आता वडिलांसोबत लंडनमध्येच राहतो.