IPL2018: सलामीच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय

आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईत रंगतदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. पहिली आणि सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunil Desale Updated: Apr 7, 2018, 10:01 PM IST
IPL2018: सलामीच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय
Image: @IPL Twitter Video

मुंबई : आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईत रंगतदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. पहिली आणि सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या टीमवर बंदी घातल्यानंतर आता दोन वर्षांनी चेन्नईची टीम पुन्हा मैदानात उतरत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचं नेत्रृत्व महेंद्रसिंग धोनी करत आहे तर मुंबई इंडियन्सच्या टीमचं नेत्रृत्व मुंबईकर रोहित शर्मा करत आहे.

मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्तफिझूर रहमान, इशन किशन, चहर, लेविस, तिवारी, कटिंग, संगवान, ड्युमिनी, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, आदित्य तरे, मार्कंड, धनंजय, अंकुल रॉय, मिचेल मॅक्लनघन, मोहसिन खान.

चेन्नई सुपर किंग्जची टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, डुप्लेसिस, हरभजनसिंग, ड्वेन ब्राव्हो, वॉटसन, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शर्मा, मोनू कुमार, बिश्नोई, केदार जाधव, रायुडू, दीपक, असिफ, एन्गिडी, ध्रुव, मुरली विजय, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, चहर, शार्दूल ठाकूर.