आयर्लंड आणि अफगाणिस्तानला मिळाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा

आयर्लंड आणि अफगाणिस्तानला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला आहे.

Updated: Jun 22, 2017, 08:34 PM IST
आयर्लंड आणि अफगाणिस्तानला मिळाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा title=

लंडन : आयर्लंड आणि अफगाणिस्तानला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला आहे. लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आयर्लंड आणि अफगाणिस्तानला टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दर्जा देण्यासाठी मतदान घेण्यात आलं. मतदानावेळी दोन्ही देशांना टेस्टचा दर्जा मिळण्याचा बाजूनं मत पडल्यामुळे आता जगभरात टेस्ट क्रिकेट खेळणारे १२ देश होणार आहेत.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज हे दहा संघ टेस्ट क्रिकेट खेळत होते आता त्यामध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तानची भर पडली आहे.

२००७ मध्ये आयर्लंडनं त्यांचा पहिला वर्ल्ड कप खेळला आणि याच वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पाकिस्तानला हरवलं. यानंतर झालेल्या आयसीसीच्या प्रत्येक टूर्नामेंटमध्ये आयर्लंडचा सहभाग होता.

२०११मध्ये अफगाणिस्तानला वनडे क्रिकेटचा दर्जा मिळाला पण २०११च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी स्कॉटलंडला हरवत इतिहास घडवला होता.