ड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट?

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो सध्या भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी आला आहे. 

Updated: Apr 18, 2018, 09:31 PM IST
ड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट? title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो सध्या भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी आला आहे. आयपीएलमध्ये ब्राव्हो चेन्नईच्या टीमकडून खेळत आहे. मैदानामध्ये ब्राव्हो क्रिकेटबरोबरच त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर त्याच्या गाण्यांमुळेही ब्राव्हो नेहमीच चर्चेत असतो. यंदा मात्र ब्राव्हो त्याच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलाय. ब्राव्हो अभिनेत्री नताशा सुरीला डेट करत असल्याचं वृत्त स्पॉट बॉय या वेबसाईटनं दिलं आहे. काही दिवसांपूर्वी नताशानं ब्राव्होबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धची मॅच बघण्यासाठी नताशा वानखेडे स्टेडियमवर आली होती. ब्राव्होनंही त्यादिवशी वादळी खेळी करून मुंबईला पराभवाची धूळ चारली.

 

All the best for #IPL my friend @djbravo47 . Shine on!! #dwaynebravo #natashasuri #indianpremierleague #djbravo #indianpremierleague2018 #cricket #indiancricket #friends

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on

कोण आहे नताशा सुरी?

२००६ मध्ये नताशा सुरी मिस इंडिया वर्ल्ड झाली होती. सध्या नताशा सुरी इनसाईड एज ही टीव्ही सीरिज करत आहे. तसंच नताशा ही टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचलनही करते. मिस वर्ल्ड स्पर्धेमध्येही ती टॉप १०मध्ये होती. नताशानं आत्तापर्यंत ६०० पेक्षा अधिक फॅशन शो केले आहेत. २०१६ साली नताशानं किंग लायर या मल्ल्याळी चित्रपटातून पदार्पण केलं. बा बा ब्लॅक शीप हा नताशाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नताशाबरोबर अनुपम खेर, अनू कपूर आणि मनिष पॉल आहेत. 

ब्राव्हो-नताशाचा इन्कार

आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आमच्यामध्ये असं काहीही नाही, असं सांगत ब्राव्हो आणि नताशानं डेटचं वृत्त फेटाळून लावलं आहे. 

 

Shot last month by Kaustub Kamble @kaustubh_19 Muh by @sagarmakeupandhair #NatashaSuri

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on

 

#Repost @instantbollywood with @get_repost ・・・ She is famous for her sultry beauty, charming smile, incredible hourglass body & her classy panache. Miss India World, TV Host & Actor @natashasuri 's ravishing new pics are giving us beauty & fitness goals. . She set the screen ablaze with her persona & charm in the popular webseries 'Inside Edge' on Amazon Prime. She will be next seen in bollywood film 'Baa Baaa Black Sheep' starring alongside Anupam Kher, Maniesh Paul, Annu Kapoor, Kay Kay Menon & more, to be released on 9th March 2018' across India. . Natasha was voted by Maxim as one of the sexiest women in India. We wish this gorgeous diva all the best for her projects. Shot by Kaustub Kamble @kaustubh_19 . #NatashaSuri #Actor #MissIndiaWorld #TVHost #SuperModel #Bollywood #BollywoodActress #IndianActress #SexiestWoman #VersatileActor

A post shared by Natasha Suri (@natashasuri) on