नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

Updated: May 27, 2019, 08:59 PM IST
नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं

म्युनिच : कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. जर्मनीमध्ये झालेल्या नेमबाज विश्वचषक स्पर्धेत तिनं २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदाकाला गवसणी घातली आणि २०२० रियो ऑलिम्पिकसाठीचं तिकीट निश्चित केलं. राहीनं यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर रियो ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे तिची संधी हुकली होती. राहीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अनेक पदकांची कमाई केली आहे.

त्याआधी आज सौरभ चतुर्वेदी या १७ वर्षांच्या युवकाने १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवून दिलं. सौरभ चतुर्वेदीने २४६.३ पॉईंट्सचा स्कोअर करून स्वत:चंच २४५ पॉईंट्सचं रेकॉर्ड मोडलं. सौरभ चौधरीने यावर्षाच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये झालेल्या विश्वचषकातही सुवर्ण पदकाची कमाई केली होती. २०१८ सालच्या युथ ऑलिम्पिकमध्ये आणि २०१८ सालच्या आशियाई स्पर्धेतही चौधरीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. रविवारी अपुर्वी चंडेलानेही सुवर्ण पदकाची कमाई केली होती.