Jasprit Bumrah ने घातला सर्वात महागडा शर्ट, किंमत एकूण थक्क व्हाल

Jasprit Bumrah Balenciaga Shirt : जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बुमराहने (Jasprit Bumrah shirt), "हो सादती है दुनिया यार दी चड्त तो रोकिया ना रुकडा एह बैहम कठोर दो मे कहा डब्बन दबों वाली गल छड्ड दो रख दिंडा पट्टा के घबरू जड तो", असे पंजाबीतल्या काही लाईन्स लिहल्या आहेत.

Updated: Dec 4, 2022, 08:40 PM IST
Jasprit Bumrah ने घातला सर्वात महागडा शर्ट, किंमत एकूण थक्क व्हाल  title=

Jasprit Bumrah Balenciaga Shirt : टीम इंडिया सध्या बांगलादेश (India vs Bangladesh) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात काही सिनियर खेळाडू सहभागी झाले आहेत, तर काही अद्याप विश्रांती घेत आहे. यात जसप्रीत बुमराहच (Jasprit Bumrah) नाव समोर येत आहे. त्यात आता मैदानाबाहेर असून सुद्धा टीम इंडियाचा अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah shirt) चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्यामागचं कारण त्याचं शर्ट ठरले आहे. नेमकं त्याच्या शर्टमध्ये असे काय आहे, ज्यामुळे त्याची चर्चा रंगलीय, हे जाणून घेऊयात. 

फोटोत काय?

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बुमराहने (Jasprit Bumrah shirt), "हो सादती है दुनिया यार दी चड्त तो रोकिया ना रुकडा एह बैहम कठोर दो मे कहा डब्बन दबों वाली गल छड्ड दो रख दिंडा पट्टा के घबरू जड तो", असे पंजाबीतल्या काही लाईन्स लिहल्या आहेत. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक आणि कमेंट केले आहे. 

शर्टाची किंमत किती? 

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah shirt) फोटोत प्रसिद्ध फ्रेंच ब्रँड बॅलेन्सियागाचा शर्ट परिधान केलेला दिसत आहे. Balenciaga हा एक सामान्य ब्रँड नाही जो प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही. जे खुप जास्त पैसै कमवतात, तेच अशाप्रकारचे शर्ट खरेदी करतात. बुमराहने (Jasprit Bumrah) खरेदी केलेल्या शर्टची किंमत सुमारे 1 लाख 13 हजार रुपये आहे. दरम्यान हे खुप महागड टीशर्ट आहे. क्रिकेटमध्ये एका खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची किंमत मिळते, तितकी या शर्टची किंमत आहे. 

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah shirt) गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ भारतीय संघाकडून कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही आहे. सप्टेंबरपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. क्रिकेटपासून दूर असण्याचे कारण त्याची दुखापत आहे. दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. तसेच दुखापतीमुळे तो T20 विश्वचषकही खेळू शकला नाही. लवकरच त्याच्या मैदानात वापसीची क्रिकेट फॅन्स प्रार्थना करतायत.