पंजाबच्या के.एल.राहुलचं सर्वात जलद अर्धशतक

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना के.एल.राहुलनं आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. 

Updated: Apr 8, 2018, 07:44 PM IST
पंजाबच्या के.एल.राहुलचं सर्वात जलद अर्धशतक  title=
सौजन्य : बीसीसीआय

मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना के.एल.राहुलनं आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्ये राहुलनं फक्त १४ बॉल्समध्येच अर्धशतक केलं. १६ बॉल्समध्ये ५१ रन्स करून राहुल आऊट झाला. राहुलच्या इनिंगमध्ये ६ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. 

सर्वात जलद अर्धशतक करणारे खेळाडू

खेळाडू   टीम  विरुद्ध वर्ष 
के.एल.राहुल(१४बॉल) पंजाब दिल्ली २०१८
युसुफ पठाण(१५बॉल) कोलकाता हैदराबाद २०१४
सुनिल नारायण(१५बॉल) कोलकाता  बैंगलोर २०१७
सुरेश रैना(१६बॉल) चेन्नई पंजाब २०१४
अॅडम गिलख्रिस्ट (१७बॉल) हैदराबाद  दिल्ली २००९