"तुला सोडणार नाही, बाहेर ये तुला दाखवतो...", जेव्हा सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या 'ह्या' खेळाडूला दाखवली... 'दादागिरी'

IND vs PAK: ज्या बॉलला सिक्स जाणार होता, त्या बॉलवर चौकार मारला, असं म्हणत शोएबने गांगुलीला डिवचलं. त्याच्या पुढच्या बॉलवर गांगुला आऊट झाला. शोएबने हा प्रकार मुद्दामहून केला होता. गांगुलीचा पारा चढला अन्..

Updated: Feb 26, 2023, 10:59 PM IST
 "तुला सोडणार नाही, बाहेर ये तुला दाखवतो...", जेव्हा सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या 'ह्या' खेळाडूला दाखवली... 'दादागिरी' title=
Sourav Ganguly ,Shoaib Malik

Sourav Ganguly Shoaib Malik Fight: पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या 2005 साली झालेल्या शाब्दिक युद्धाचा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केलाय. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हणजे कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. असे अनेक सामने दोन्ही देशांनी पाहिले आहेत. असाच एक सामना झाला होता तो 2005 साली. (Kamran Akmal talk On Sourav Ganguly Shoaib Malik Fight in 2005 India vs Pakistan test match)

काय म्हणाला Kamran Akmal ?

2005 मोहाली कसोटी सामन्यात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सौरव गांगुली आणि शोएब मलिक (Sourav Ganguly vs Shoaib Malik) यांच्यात मैदानी आणि शाब्दिक लढत पहायला मिळाली. अलीकडंच माजी पाकिस्तानी खेळाडू कामरान अकमलने त्या घटनेची आठवण करून दिली आहे, जेव्हा गांगुली फलंदाजी करत होता तेव्हा त्याने शोएबच्या चेंडूवर त्याने शानदार चौकार मारला होता. त्यावेळी वाद सुरू झाला.

नेमकं काय झालं?

गांगुली शेजारी असताना मलिकने मला सांगितलं की हा दबावाचा खेळ आहे, ज्या बॉलला सिक्स जाणार होता, त्या बॉलवर चौकार मारला, असं म्हणत शोएबने गांगुलीला डिवचलं. शोएब अकमलला म्हणत होता. मात्र, त्याचा निशाणा गांगुली होती. त्याच्या पुढच्या बॉलवर गांगुला आऊट झाला. शोएबने हा प्रकार मुद्दामहून केला होता.

आणखी वाचा - ना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...

दरम्यान, दादाला (Sourav Ganguly) ज्यावेळी याची चाहूल लागली. त्यावेळी त्याचा पारा चढला. आऊट झाल्यानंतर गांगुली खूप रागावलेला दिसत होता, त्यावेळी दादा शोएबला म्हणाला, "तू खूप वेगवान आहेस, मी तुला सोडणार नाही, तू बाहेर येऊन मला भेट". मात्र हा सामना अखेर अनिर्णित राहिला, असं कामरान अकमल (Kamran Akmal On Sourav Ganguly Shoaib Malik Fight) सांगतो.