AFG vs PAK : 'आज माझी आई असती तर...', विजयानंतर नसीम शाहच्या डोळ्यात तरळले अश्रू; पाहा Video

Naseem Shah Emotional Video : दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानला आभाळ ठेंगणं झालं. विजयानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानात धावले आणि नसीमला शब्बासकी दिली.

Updated: Aug 26, 2023, 04:50 PM IST
AFG vs PAK : 'आज माझी आई असती तर...', विजयानंतर नसीम शाहच्या डोळ्यात तरळले अश्रू; पाहा Video title=
Naseem Shah Emotional Video

Naseem Shah Viral Video : आशिया कप 2023 स्पर्धेपूर्वी (Asia Cup 2023) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात श्रीलंकेत वनडे सीरीज खेळत आहेत. भारताच्या फिरकीला आव्हान देण्याआधी पाकिस्तान अफगाणिस्तानसमोर लोटांगण घालताना दिसतोय. पहिल्या सामन्यात बॉलिंगच्या जोरावर आरामात विजय मिळवलेल्या पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात (AFG vs PAK 2nd ODI) अफगाणिस्तानने कडवी झुंज दिल्याचं पहायला मिळालं. या सामन्याचा हिरो ठरला नसीम शाह... या सामन्यातील विजयानंतर नसीमला आईची आठवण आल्याचं दिसून आलं आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे.

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून विजयासाठी 301 धावांच लक्ष्य मिळालं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं. दुसऱ्या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा देखील पहायला मिळाला. पाकिस्तानच्या अखेरच्या 3 बॉलवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी नसीम शाह मैदानात पाय रोवून उभा होता. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर नसीमने चौकार मारला अन् पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला. अखेरच्या 2 बॉलवर 3 धावांची गरज होती. त्यावेळी नसीमने फोर खेचला आणि पाकिस्तानचा मोठा विजय झाल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानला आभाळ ठेंगणं झालं. विजयानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानात धावले आणि नसीमला शब्बासकी दिली.

पाकिस्तानला विजय मिळवून दिल्यानंतर नसीम शाह खूप भावूक झाल्याचा दिसला आणि त्याला आईची आठवण आली अन् त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज माझ्याकडे शब्द नाहीत. कदाचित आज माझ्या आईने हे बघितलं असतं, असं नसीम शाह म्हणाला आहे. त्याचा भावूक झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय. या सामन्यानंतर बाबर आझम देखील संतापल्याचं दिसून आलं होतं. तर सामन्यातील मंकडिंग देखील चर्चेचा विषय राहिली.

पाहा Video

दरम्यान,  पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना कोलंबोच्या आर.के. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. त्यामुळे आता अखेरचा सामना कोण जिंकणार? पाकिस्तान 3-0 ने जिंकून व्हाईट वॉश देणार की अफगाणिस्तान लाज राखणार? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.