Team India: अर्शदीपच्या No Ball मुळे इरफान चांगलाच भडकला, म्हणाला "कायद्यात राहिला तर..."

Arshdeep Singh No Ball: दुसऱ्या सामन्यात सर्वात महागडा ठरला तो अर्शदीप. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) फक्त दोन ओव्हरमध्ये 37 रन दिले. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Updated: Jan 6, 2023, 08:14 PM IST
Team India: अर्शदीपच्या No Ball मुळे इरफान चांगलाच भडकला, म्हणाला "कायद्यात राहिला तर..." title=
Irfan pathan ,Arshdeep Singh

Irfan pathan On Arshdeep Singh : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (IND vs SL 2nd T20) भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे श्रीलंकेने मोठी धावसंख्या उभी केली. त्याचं फलित त्यांना मिळालं आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारत आणि श्रीलंका यांच्यातकील दुसरा सामना चर्चेत राहिला तो अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांच्यामुळे...अर्शदीपने या सामन्यात 5 नो बॉल टाकले. त्यामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. (Kayde mein Rahoge to fayde mein rahoge Irfan Pathan reacts to Arshdeep Singh no ball issue in IND vs SL 2nd T20I marathi news)

दुसऱ्या सामन्यात सर्वात महागडा ठरला तो अर्शदीप. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) फक्त दोन ओव्हरमध्ये 37 रन दिले. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यावेळी त्याने पहिल्या ओव्हरमध्ये तीन नो बॉल (No Ball) तर दुसऱ्यामध्ये दोन नो बॉल टाकले. त्यामुळे अर्शदीपला नेमकं झालंय काय?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशातच आता अर्शदीपला ट्रोल केलं जात असल्याचं पहायला मिळतंय.

आणखी वाचा - Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले!

सगळीकडून टीका होत असताना टीम इंडियाचा (Team India) माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan pathan) याने ट्विट करत अर्शदीपला खडे बोल सुनावले आहेत. 'कायद्यात राहिला तर फायद्यात रहाल', असं ट्विट इरफान पठाणने (Irfan Pathan Tweet) केलंय. तर इतर खेळाडूंनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा ट्विट - 

दरम्यान, अर्शदीप सिंहच्या नावावर अनोखा विक्रम (Arshdeep Singh Record) नावावर केलाय. टी-ट्वेंटी (T20I) सामन्यात सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. वेस्ट इंडिजच्या कीमो पॉलने (Keemo Paul) देखील 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 5 नो बॉल टाकले होते. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी सामन्यात अर्शदीपला संधी मिळणार की नाही?, अशी चर्चा होताना दिसत आहे.