T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपसाठी 'किंग कोहली'ची खास तयारी, द्रविडने सांगितला 'मास्टर प्लॅन'

T20 World Cup 2022 मध्ये Virat Kohli करणार कमाल! द्रविडने केला मास्टर प्लॅन तयार!

Updated: Oct 11, 2022, 09:10 PM IST
T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपसाठी 'किंग कोहली'ची खास तयारी, द्रविडने सांगितला 'मास्टर प्लॅन' title=

Virat Kohli : आगामी T20 World Cup 2022 साठी आता टीम इंडिया (Team India) तयारीला लागली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), के एल राहूल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) तसेच सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सारखे खेळाडू वर्ल्ड कपपूर्वी कसून तयारी करत आहेत. तसेच गोलंदाजीवर देखील टीम इंडिया (Team India) भर देताना दिसत आहे. अशातच आता वर्ल्ड कपपूर्वी 'किंग कोहली' (King kohli) खास तयारी करताना दिसतोय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कोहली नेटमध्ये जोरदार सराव करताना दिसतोय. मात्र, या व्हिडीओमधली सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रशिक्षक राहुल द्रविडचा थ्रो डाऊन... (Throw Down Rahul Dravid) व्हिडिओमध्ये द्रविड स्वतः कोहलीला थ्रो-डाउन करत आहे आणि त्याला फलंदाजीच्या टिप्सही देताना दिसतोय.

आणखी वाचा - Hardik Pandya च्या Birthday ला Natasha ची खास पोस्ट, शेअर केला 'तो' खासगी व्हिडीओ!

विराटच्या एका शॉटवर द्रविड (Rahul Dravid) त्याला लेगच्या बाजूने खेळण्यास सांगतो आणि सरळ बॅटने खेळण्याचा सल्ला देतो, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रशिक्षक द्रविड हे त्याच्या काळातील महान फलंदाज आहेत आणि कोहली (Virat Kohli) त्याच्याकडून खूप काही शिकू शकतो. विराट गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. मात्र, आता विराट पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने 3 वर्षाचा दुष्काळ संपवला. आशिया कपमध्ये (Asia Cup) विराटने शतक झळकवत टी-ट्वेंटी (T20 World Cup 2022) संघात दावेदारी ठोकली. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपमध्ये कोहली कमाल दाखवेल, अशी सर्वांचीच इच्छा आहे.