दीपिकाने दिला जुळ्या मुलांना जन्म, दिनेश कार्तिकने सांगितली नावं

दिवाळीआधीच मोठं गिफ्ट! दिनेश कार्तिकच्या घरी आली सलामीची जोडी...दीपिकाने दिला 2 जुळ्या मुलांना जन्म

Updated: Oct 29, 2021, 06:21 AM IST
दीपिकाने दिला जुळ्या मुलांना जन्म, दिनेश कार्तिकने सांगितली नावं

मुंबई: दिवाळीआधीच दिनेश कार्तिकला खास गिफ्ट मिळालं आहे. दिनेश कार्तिकच्या घरी गोंडस पावलं आली आहे. दिनेशची पत्नी दीपिकाने गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दिनेश कार्तिकने ही आनंदाची गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

दिनेश कार्तिकने कॅप्शनमध्ये आम्ही तीन नाही तर आता पाच असं म्हणत दिनेश-दीपिका आणि दोन गोंडस मुलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चौघंही खूप सुंदर दिसत आहेत. दिनेशने या दोन्ही मुलांची नाव देखील चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. 

दिनेशने सोशल मीडियावर या दोघांची नाव सांगितली आहेत. कबीर आणि झियान अशी या दोन्ही गोंडस मुलांची नाव आहेत. दोन गोंडस मुलं, पत्नी स्वत: दिनेश आणि त्यांचा गोंडस कुत्रा असा एक कुटुंबाचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.