T20 World Cup : IPL मध्ये दमदार कामगिरी करणारा गोलंदाज अचानक भारतात परतला

नेमकं काय घडलं? टीम इंडियामधील बॉलर अचानक परतला भारतात

Updated: Oct 28, 2021, 05:57 PM IST
T20 World Cup : IPL मध्ये दमदार कामगिरी करणारा गोलंदाज अचानक भारतात परतला

मुंबई: ICC T20 World Cup चे सामने सुरू आहेत. याच दरम्यान आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारा टीम इंडियाचा बॉलर अचानक मायदेशी परतला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा बॉलर भारतात परतला आहे. नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तडकाफडकी त्याने हा निर्णय घेतला याची चर्चा होत आहे. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रविवारी होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा नेट बॉलर भारतात परतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. 

टीम इंडियाने ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये पहिला सामना खेळला. दुसरा सामना रविवारी होणार आहे. IPLमध्ये दिल्लीकडून जबरदस्त कामगिरी करणारा आवेश खान भारतात परतला आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी त्याची टीम इंडियासाठी नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. 

IPL मध्ये आवेशने 15 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात हर्षल पटेलनंतर सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू आवेश खान ठरला आहे. 140 किलोमीटर प्रति तासपेक्षा वेगानं बॉलिंग टाकणाऱ्या आवेशची टीम इंडियासाठी नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. 

आवेश खाननं इन्स्टाग्राम स्टोरीवर दिल्लीला परतल्याचा फोटो शेअर केला. आवेश काही वैयक्तीक कारणांमुळे घरी परतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.