Gold Rate Today: आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झालेत हे जाणून घेईया. सुरुवातीला सोनं-चांदीच्या दरात नरमाई दिसून येत होती. मात्र त्यानंतर दरात थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 78 हजारांवर पोहोचलं आहे. MCX वर आज चांदी 87,400 रुपयांच्या वर पोहोचली आहे. 2024 मध्ये सोनं-चांदीत जबरदस्त परतावा मिळाला होता. मागील वर्षी सोनं 21 टक्कांची तेजी आली होती. 2025मध्ये आर्थिक पॉलिसी आणि फेडरल बँकेच्या मार्केटवर फोकस असणार आहे.
आज सकाळी वायदे बाजारात सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 78,800 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. मागील एक वर्षात सोन्याच्या किंमती 15,030 रुपये म्हणजेच 23.5 टक्क्यांनी वाढलं असून 78,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. मंगळवारी चांदीच्या किंमती 2 हजार रुपयांनी कमी होऊन 89,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहे. मागील सत्रात चांदी 91,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून 71,500 रुपये प्रतितोळावर स्थिरावली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली असून 78,000 रुपये प्रतितोळा आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची वाढ झाली असून 58,500 रुपये प्रतितोळावर स्थिरावली आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 500 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 78, 000 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,500 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,150 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,800 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 850 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,220रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,400 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,800 रुपये
22 कॅरेट- 71, 500 रुपये
24 कॅरेट- 78, 000 रुपये
18 कॅरेट- 58,500 रुपये