KL Rahul, IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चालू असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल याने धमाकेदार सेंच्युरी ठोकली आहे. केएल राहुलने केवळ 100 बॉलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला. राहुलने ना शाबादला पाहिलं ना शाहीनला, जो येईल त्याला फोडण्याचं काम केएल राहुलने केलंय. 10 फोर आणि 2 सिक्सच्या जोरावर राहुलने वादळी खेळी केली. केएल राहुल याने 35 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शादाब खान याच्या बॉलिंगवर 84 मीटर लांब कडक सिक्स ठोकला. त्यानंतर त्याने घेर बदलले. केएल राहुलने आतिषबाजी सुरू केली अन् भारताला 300 पार नेलं. त्याला विराट कोहलीने मोलाची साथ दिली.
चार महिन्यानंतर मैदानात उतरलेल्या केएल राहुलने धमाकेदार शतक ठोकत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय. केएल राहुलला घेऊ नका.. तो अजूनही जखमी आहे, अशी टीका केली जात होती. त्यानंतर आता राहुलने मैदानात उरतून सडकून उत्तर दिलंय. राहुलला विराट कोहलीने मोलाची साथ दिली. विराटने देखील 122 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी अन् शादाब खान यांनी 1-1 विकेट घेतलीये.
World class shots from KL Rahul.
- This is Rahul show. pic.twitter.com/Y5XrApqX9e
— Johns. (@CricCrazyJohns) September 11, 2023
टॉस जिंकून पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजांना फोडून काढलं. शुभमन गिलने दमदार सुरूवात केली. त्याने सुरूवातीपासून चौकाराचा पाऊस पाडला. त्यानंतर रोहितने घेर बदलले अन् त्याने चार सुंदर षटकार खेचत टीम इंडियाला 100 पार केलं. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने 121 धावांची भागेदारी केलीये. मात्र, रोहित शर्मा बाद होताच शुभमन देखील विकेट गमावून बसला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली अन् केएल राहुल यांच्या जोडीने सावध धावसंख्या खेचली. पहिल्या दिवशी 24 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोर 147 झाला होता. त्यानंतर आज रिझर्व्ह डे दिवशी झालेल्या सामन्यात केएल राहुल अन् विराट कोहलीने धमाकेदार शतक ठोकले आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.