केएल राहुलचं तिसऱ्या वनडेत शानदार शतक

केएल राहुलची आणखी एक शानदार कामगिरी

Updated: Feb 11, 2020, 11:10 AM IST
केएल राहुलचं तिसऱ्या वनडेत शानदार शतक

माउंट मोंगानुई : भारताचा बॅट्समन केएल राहुलची क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी सुरु आहे. न्यूझीलंडच्या विरोधात ५ सामन्यांच्या टी20 सीरीजमध्ये त्याने सर्वाधिक 224 रन केल्यानंतर, वनडे सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात त्याने शानदार शतक ठोकलं आहे. भारताला ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्याने चांगली कामगिरी केली आहे. राहुलने करिअरमधील चौथं शतक ठोकलं आहे. त्याने 104 बॉलमध्ये शतक ठोकलं. ज्यामध्ये 9 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. केएल राहुल ११२ रनवर आऊट झाला आहे. 

आजच्याच दिवशी राहुलला 11 जानेवारी 2019 ला बीसीसीआयने सस्पेंड केलं होतं. केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने कॉफी विद करन शोमध्ये महिलांबद्दल चुकीचं विधान केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर राहुलला पश्चाताप झाला होता. बाहेर पडायला ही त्याला भीती वाटत होती. पण आज त्याने आपल्या कामगिरीने भारतीयांनी मनं जिंकली आहेत.