कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. ज्या प्रकारे करिअरच्या अंतिम टप्प्यात टीका होत असलेल्या महेंद्र सिंह धोनीचं विराटने समर्थन केलं ते खूप चांगलं असल्याचं तो म्हणाला.
गांगुली म्हणाला की, कोहली एक चांगला कर्णधार आहे. मला माहीत नाही की, ड्रेसिंग रूममध्ये काय करतो, कारण मी टीमपासून खूप दूर होतो. मला नाही माहीत की तो टीम मिटींगमध्ये काय बोलतो, पण तो ज्याप्रकारे टीमच्या खेळाडूंची काळजी घेतो ते असाधारण आहे.
तो म्हणाला, ‘मी महेंद्र सिंह धोनीबदल बोलत राहतो आणि मी धोनीबाबत विराटमध्ये जे पाहिलंय ते शानदार आहे. एक चॅम्पियन खेळाडू जो करिअरच्या अंतिम टप्प्यावर आहे आणि अशात विराटचं येऊन असं म्हणनं की, तो माझा खेळाडू आहे. आणि मला त्याला खेळवायचं आहे. यामुळे खेळाडूमध्ये मोठा बदल होतो’.
वीवीएस लक्ष्मण आणि अजीत आगरकरसहीत काही माजी भारतीय खेळाडूंनी टी-२० मध्ये धोनीच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले होते. नेट्वेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये विजय मिळवल्यावर गांगुलीची लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट उतरवण्याची प्रतिमा अजूनही लोकांच्या मनात आहे. त्याबाबत सौरव म्हणाला की, ‘याआधी आम्ही तीन फायनल गमावले होते. मॅचनंतर तसे करणे मला मोठा दिलासा देणारं वाटलं. मी भावनिक झालो होतो’.