'या' भारतीय बॉलरच्या मनात आला होता आत्महत्या करण्याचा विचार

चायनामॅन बॉलिंग अॅक्शनने जगभरातील क्रिकेटर्सला त्रासदायक ठरलेला टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादवने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 13, 2017, 09:11 AM IST
'या' भारतीय बॉलरच्या मनात आला होता आत्महत्या करण्याचा विचार title=

नवी दिल्ली : चायनामॅन बॉलिंग अॅक्शनने जगभरातील क्रिकेटर्सला त्रासदायक ठरलेला टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादवने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुलदीप यादवने केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कुलदीप यादवने आपल्या मुलाखतीत सांगितले की, "१३ वर्षांचा असताना मला अंडर-१५ च्या टीमसाठी खेळायचं होतं. मात्र, टीममध्ये माझी निवड झाली नाही. यामुळे मी इतका नाराज झालो होतो की, आत्महत्या करण्याचाही विचार मनात आला होता".

'चाइनामैन' कुलदीप यादव की दर्द भरी कहानी, क्रिकेट छोड़ सुसाइड करने का बना लिया था मन
File Photo

अंडर-१५ टीमसाठी निवड व्हावी यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. मात्र, त्यानंतरही निवड न झाल्याने नाराज झालो होतो. मग, क्रिकेट सोडण्याचाही विचार मी केला. मग, माझ्या वडीलांनी माझं मनोबल वाढवलं, प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी पोहचलो असंही कुलदीप यादवने म्हटलं आहे.

शाळेत मजा-मस्ती करत क्रिकेट खेळत होतो. मात्र, वडिलांना वाटत होतं की, क्रिकेटमध्ये मी काहीतरी खास करावं आणि त्यामुळेच वडीलांनी मला लहान असतानाच कोचकडे पाठवलं असे कुलदीपने सांगितले.

कुलदीप यादव हा फास्ट बॉलरचं स्वप्न घेऊन ट्रेनिंगसाठी जात होता. मात्र, प्रशिक्षकांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखत त्याला स्पिन बॉलिंग शिकवण्यास सुरुवात केली.

कुलदीपच्या स्पिन बॉलिंगने विरोधी टीमच्या बॅट्समनला चांगलचं गोंधळात टाकलं. त्यामुळे कुलदीपचा आत्मविश्वास वाढला आणि मग तो शेन वॉर्नची कॉपी करायला लागला. कुलदीप वसीम आकरम यालाही आपला आदर्श मानतो कारण त्याला एक फास्ट बॉलर बनायचं होतं.