लक्ष्मीपती बालाजी चैन्नई सुपरकिंग संघांंचा कोच

भारताचा माजी क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजी आयपीएलच्या 2018च्या पर्वामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे. चैन्नईच्या संघामध्ये महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा हे खेळाडू कायम आहेत. 

Updated: Jan 20, 2018, 01:00 PM IST
लक्ष्मीपती बालाजी चैन्नई सुपरकिंग संघांंचा कोच   title=

चेन्नई  : भारताचा माजी क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजी आयपीएलच्या 2018च्या पर्वामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे. चैन्नईच्या संघामध्ये महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा हे खेळाडू कायम आहेत. 

चैन्नई सुपर किंगच्या सीईओची घोषणा 

चैन्नई सुपरकिंगचे सीईओ के एस विश्वनाथन यांनी एका कार्यक्रमात संघाच्या प्रशिक्षकांची यादी घोषित केली. यानुसार स्टीफन फ्लेमिंग संघाचा कोच असेल  तर  ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माइकल हस्सी फलंदाजी कोच आणि बालाजी गोलंदाजीचे कोच असतील.  

संघामध्ये  ट्रेनर ग्रेगरी किंग आणि  फिजियो टामी सिमसेक यांचा सहभाग राहणार आहे. 

आयपीएलमध्ये बालाजीचे शानदार प्रदर्शन 

बालाजीने आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये हॅट्रिक घेतली होती. 10 मे 2008 साली चैन्नई सुपर किंगच्या संघातून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबच्या 
विरूद्ध ही कमाल झाली होती. इरफान पठाण, पीयुष चावला आणि वीआरवी सिंह यांना आऊट करण्यात आले.  

बालाजीला अनेकदा खराब फीटनेसमुळे टीमच्या बाहेर रहावे लागले होते. 34 वर्षीय बालाजीने भारतासाठी 8 टेस्ट आणि 30 वनडे मॅच खेळला आहे.