सेल्फीवरही विराटचीच मक्तेदारी...

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी दमदार विजय मिळवला. चौथ्याच दिवशी भारतीय संघाने हा सामना खिशात घातला. 

Updated: Jul 31, 2017, 12:29 PM IST
सेल्फीवरही विराटचीच मक्तेदारी...

गॉ़ल : भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करताना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी दमदार विजय मिळवला. चौथ्याच दिवशी भारतीय संघाने हा सामना खिशात घातला. 

पहिल्या विजयानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये चांगलीच मजा मस्ती करतोय. यादरम्यानच भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने ट्विटरवर फोटो अपलोड केलेत.

राहुलने दोन फोटो शेअर केलेत. यात विराट कोहली आणि राहुल हॉटेलच्या स्वीमिंग पूलच्या समोर आराम करताना दिसतायत. यादरम्यान कोहलीने आपल्या मोबाईलवरुन सेल्फी घेतला. 

राहुलने विराटचा सेल्फी शेअर करताना म्हटलंय की जेव्हा कॅप्टन सेल्फी घेतो तेव्हा तुम्ही कोणत्याही स्थिती सेल्फीसाठी तयार झाले पाहिजे.