खतरनाक यॉर्कर आणि कृणाल पांड्याची दांडीगुल, बर्थ डे बॉयचा लाईव्ह मॅचमध्ये जलवा

एका गुगलीनं उडाली कृणाल पांड्याची विकेट, घातक बॉलरने सरावातही तोडलेला स्टंम्प

Updated: Apr 5, 2022, 08:41 AM IST
खतरनाक यॉर्कर आणि कृणाल पांड्याची दांडीगुल, बर्थ डे बॉयचा लाईव्ह मॅचमध्ये जलवा title=

मुंबई : आयपीएलमध्ये 12 वा सामना लखनऊ विरुद्ध हैदराबाद झाला. या सामन्यात पुन्हा एकदा हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. 12 धावांनी हैदराबादचा पराभव झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये एकापेक्षा एक खतरनाक बॉलर्सचा जलवा पाहायला मिळत आहे. 

बुमराहनंतर सर्वात घातक यॉर्कर कोण टाकत असेल तर तो टी नटराजन आहे. त्याच्या गुगलीनं दांडी कधी गुल होते याचा अंदाजही येत नाही. टी नटराजनच्या गोलंदाजीनं कमेंट्री करणारेही हैराण झाले. त्याने ज्या पद्धतीनं कृणालची विकेट काढली ती पाहण्यासारखीच होती. 

टी नजरानंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 एप्रिलला टी नटराजनचा वाढदिवस होता. बर्थ डे बॉयनं याच दिवशी जबरदस्त कामगिरी केली. त्याने कृणाल पांड्याला यॉर्कर टाकून आऊट केलं. कृणालला आपण आऊट झालो हे कळण्यासाठी काही सेकंद गेली. 

टी नटराजनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याने 2 विकेट्स आपल्या नावावर केले. नटराजन हैदराबादकडून खेळत आहे. सरावा दरम्यान त्याने आपल्या बॉलिंगने स्टंम्प तोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

टी नटराजन 2021 मध्ये फक्त हैदराबादकडून 2 सामने खेळला. दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं. आता तो पूर्ण फिट झाला असून मैदानावर पुन्हा खेळताना दिसत आहे. मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी लखनऊ आणि हैदराबादमध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर हैदराबादने त्याला 4 कोटी देऊन आपल्या टीममध्ये घेतलं.