दक्षिण आफ्रिकेसाठी पुन्हा ही गोष्ट ठरली 'लकी'

विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 11, 2018, 01:14 PM IST
दक्षिण आफ्रिकेसाठी पुन्हा ही गोष्ट ठरली 'लकी' title=

जोहान्सबर्ग: विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली.

काय होतं लकी फॅक्टर

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी हिरव्या-पिवळ्या जर्सीमध्ये नाही तर गुलाबी रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरली. या जर्सीमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. जेव्हा जेव्हा दक्षिण आफ्रिका टीम या गुलाबी जर्सीमध्ये उतरली तेव्हा तेव्हा त्यांनी प्रत्येक सामना जिंकला आहे. त्यामुळे ही जर्सी दक्षिण आफ्रिकेसाठी लकी असल्याची चर्चा आता रंगत आहे.

प्रत्येक सामन्यात विजय

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड, खेळाडू आणि एनजीओ मिळून महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रति जागरुकता आणण्यासाठी आणि त्यासाठी फंड गोळा करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून हे काम करत आहेत. पहिल्यांदा याचं आयोजन 2011 मध्ये झालं होतं. सहाव्यांदा दक्षिण आफ्रिकेने या जर्सीमध्ये सामना खेळला. त्यामुळे चौथ्या विजयाच्या प्रयत्नात असलेल्या टीम इंडियाला पराभवाचं सामना करावा लागला. 

भारत 3-1 ने पुढे

सीरीजमध्ये 3-1 ने पुढे असलेली भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर पहिली वनडे सीरीज जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. याआधी 2010-11 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात 2-1 ने पुढे असतांना देखील नंतर भारताचा 3-2 ने पराभव झाला होता. पाचवी वनडे 13 फेब्रवारीला एलिजाबेथ येथे होणार आहे.