close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आशिया कपमधे धोनीच्या नावे बनू शकतात 3 मोठे रेकॉर्ड

आशिया कपमध्ये धोनीच्या नावे काही नवे रेकॉर्ड्स पाहायला मिळणार आहेत. 

Updated: Sep 9, 2018, 01:31 PM IST
आशिया कपमधे धोनीच्या नावे बनू शकतात 3 मोठे रेकॉर्ड

मुंबई : आशियाई देशांतील 'क्रिकेट दंगल' पाहायला मिळणारी आशिया कप काही दिवसांवर आलायं. 2008 मध्ये पाकिस्तानमध्ये आपला पहिला आशिया कप खेळणाऱ्या धोनीने 2010,2012 आणि 2016 मध्ये खेळलायं.

2014 च्या आशिया कपमध्ये तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण केवळ खेळाडू म्हणून खेळण्याची त्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. याआधी 4 पैकी दोनवेळा म्हणजेच 2012 आणि 2016 साली धोनीने आशिया कप जिंकवून दिला.  यावेळच्या आशिया कपमध्ये धोनीच्या नावे काही नवे रेकॉर्ड्स पाहायला मिळणार आहेत.

यष्टीमागे सर्वाधिक विकेट 

धोनीने आतापर्यंत आशिया कपमध्ये 13 मॅचमध्ये यष्टीमागे 24 विकेट घेतले आहेत. यामध्ये 19 कॅच आणि 5 स्टंपिंग आहेत. आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्यानावे आहे. त्याने 5 आशिया कप मध्ये एकूण 36 विकेट घेतल्या. यामध्ये 27 कॅच आणि 9 स्टंपिंग आहेत. संगकाराचा रेकॉर्ड तोडण्यासाठी धोनीला त्याच्या 5 व्या आशिया कपमधील 6 मॅचमध्ये 12 विकेट घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतर धोनी आशिया कपमधला यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारा विकेटकिपर ठरणार आहे.

टॉप 5 मध्ये 

धोनीच्यानावे आशिया कपमध्ये 13 मॅचमध्ये 95.16 च्या सरासरीने 571 रन्स केले. या कपमध्ये धोनीने 103 रन्स आणखी बनवले तर आशिया कपमधील टॉप 5 बॅट्समनमध्ये जाऊन बसेल.

सर्वाधिक रन्स 

धोनीच्यानावे 321 वनडेमध्ये 51.25च्या सरासरीने 10,046 रन्स आहेत. सर्वाधिक रन्स बनविणाऱ्यामंध्ये सध्या तो बाराव्या स्थानी आहे. धोनीच्या ठिकवर श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने 10,290 रन्स बनविले आहेत. म्हणजेच धोनीने 6 मॅचमध्ये 244 रन्स बनविले तर दिलशानला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये 11 वा सर्वाधिक स्कोअर करणारा बॅट्समन ठरला.