टी-२० मध्ये धमाका करतोय मनीष पांडे, याबाबतीत विराट सोडून सगळे मागे!

निडास ट्रॉफी टी-२० ट्राय सीरिजच्या चौथ्या सामन्यात महत्वाच्या वेळी नाबाद ४२ रन्सची खेळी करणारा फलंदाज मनीष पांडे विरोधकांची धुलाई करत आहे. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे. 

Amit Ingole Updated: Mar 13, 2018, 02:29 PM IST
टी-२० मध्ये धमाका करतोय मनीष पांडे, याबाबतीत विराट सोडून सगळे मागे!

नवी दिल्ली : निडास ट्रॉफी टी-२० ट्राय सीरिजच्या चौथ्या सामन्यात महत्वाच्या वेळी नाबाद ४२ रन्सची खेळी करणारा फलंदाज मनीष पांडे विरोधकांची धुलाई करत आहे. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे. 

गेल्या सहा टी-२० च्या तुलनेत बघितलं तर त्याच्या रन्सच्या सरासरीची बरोबरी कुणीही करू शकलं नाही. यादरम्यान त्याने ११४ च्या सरासरीने रन्स केले आहेत. 

मनीष पांडेचा धमाका

२०१८ मध्ये खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांमध्ये पांडेने ४२, २७, ३७, १३, ७९, २९ रन्स केले आहेत. आपल्या सहा खेळींपैकी ४ मध्ये तो नाबाद राहिलाय. हेच कारण आहे की, त्याची सरासरी या सामन्यांमध्ये ११४ ची झाली आहे. एकूण करिअरच्या रन्सच्या सरासरीबाबत बोलायचं तर मनीष पांडेच्या सरासरी पुढे केवळ विराट कोहली आहे. टी-२० मध्ये जो खेळाडू २० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहे, त्यात मनीष पांडे रन्सच्या सरासरीच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर आहे. 

हा रेकॉर्ड केवळ मनीषच्या नावावर

५७ सामन्यांमध्ये विराट कोहलीने ५०.८४ ची रन्सच्या सरासरीने १९८३ रन्स केलेत. तेच मनीष पांडेने २१ सामन्यांमध्ये ४२.३६ च्या सरासरीने ४६६ रन्स केले. मनीष पांडेने आपला पहिला सामना जुलै २०१५ मध्ये झिम्बॉब्वे विरूद्ध खेळला होता. आयपीएलमध्ये पहिलं शतक करण्याचं रेकॉर्ड मनीष पांडेच्या नावावर आहे.