Mark Boucher on Rohit Sharma: रोहित शर्मा खेळणार की नाही? सामन्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट समोर!

Rohit Sharma, IPL 2023: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Updated: Apr 2, 2023, 03:15 PM IST
Mark Boucher on Rohit Sharma: रोहित शर्मा खेळणार की नाही? सामन्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट समोर! title=
Rohit Sharma, IPL 2023,RCB vs MI

RCB vs MI: धमाकेदार अंदाजात सुरू झालेल्या आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पाचवा सामना विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (Royal Challengers Bangalore) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एमआयमध्ये (Mumbai Indians) खेळवला जाणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघासाठी हा पहिला सामना असल्याने विजय नोंदवून अंकतालिकेत अंकाचा श्रीगणेशा करण्यासाठी विराट-रोहित तयार आहेत. अशातच पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी मोठी अपडेट दिली आहे. (Mark Boucher on Rohit Sharma says he is fit for Mumbai Indians IPL 2023 opener vs Royal Challengers Bangalore match)

काय म्हणाले Mark Boucher?

होय, रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णपणे फिट आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्याने सराव केला असून तो खेळण्यासाठी 100 टक्के फिट आहे, अशी माहिती मार्क बाउचर यांनी दिलीये. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी रोहितची तब्येत ठीक नव्हती आणि खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्याला घरीच राहण्यास सांगितलं होतं. खेळाडूंना भरपूर फोटोशूट करावं लागतं. त्यांना स्वतःसाठी फारसा वेळ मिळत नाही. म्हणून आम्हाला वाटलं की ते अधिक चांगलं होईल, असं म्हणत कोच यांनी रोहितच्या अनुपस्थितीचं कारण सांगितलं.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी जोफ्रा (Jofra Archer) 100 टक्के फिट असल्याची माहिती मार्क यांनी दिलीये. त्याला खास प्रशिक्षण दिलं नाही परंतु ते एक वैकल्पिक प्रशिक्षण सत्र होतं. कॅप्टनला वाटलं जोफ्रा सामन्यासाठी तयार आहे तर तो खेळेल, असंही मार्क बाउचर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा - IPL 2023: "महेंद्रसिंग धोनी कडून ही अपेक्षा नव्हती", CSK च्या कर्णधारावर वीरेंद्र सेहवागचे टीकास्त्र !

दरम्यान, स्पर्धेपूर्वी सर्व कर्णधारांचे फोटोशूट करण्यात आले होते. त्यावेळी पोटदुखीमुळे रोहित अनुपस्थित होता. त्यामुळे रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता तो पूर्णपणे फीट असून आरसीबीविरुद्ध मैदानात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता मुंबईच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय.

मुंबई इंडियन्स संघ (Mumbai Indians Squad):

रोहित शर्मा (C), डेवाल्ड ब्रेविस, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (WC), ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शम्स मुलानी, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, आकाश मधवाल, दुआन जॅनसेन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, राघव गोयल