मित्रा, लवकर बरा हो! 'या' क्रिकेटपटूसाठी सचिनची प्रार्थना, कोण आहे तो खेळाडू?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या खेळाडूच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.  

Updated: Aug 28, 2021, 04:24 PM IST
मित्रा, लवकर बरा हो! 'या' क्रिकेटपटूसाठी सचिनची प्रार्थना, कोण आहे तो खेळाडू? title=

मुंबई : न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स (Chris Cairns) आता सुरक्षित आहे. मात्र त्याच्या पायाला लकवा मारला. सध्या ख्रिसवर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात दाखल केले गेलं आहे. तिथे त्याच्यावर हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. ख्रिसला स्पायनल स्ट्रोकमुळे लकावा मारला. त्यामुळे ख्रिसचे पाय नीट कामही करत नाहीयेत. ख्रिसवर ओढावलेल्या या अशा परिस्थितीमुळे क्रिकेट विश्वात दुख व्यक्त केलं जात आहे. ख्रिस यातून लवकर बरा व्हावा यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) प्रार्थना केली आहे. ख्रिसच्या आरोग्यसाठी सचिनने ट्विट करत प्रार्थना केली आहे. (master blaster sachin tendulkar prays for new zealand former cricketer Chris Cairns health via Tweet)  

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

"ख्रिसवर ओढावलेल्या या परिस्थितीमुळे मी दुखी आहे. ख्रिस लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करताय. मित्रा लवकर बरा हो. क्रिकेट संबंधित सर्वच जण तुझ्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतायेत", अशा आशयाचं ट्विट सचिनने केलं आहे. सचिन आणि ख्रिस या दोघांनी 2003 पर्यंत क्रिकेट खेळलं आहे. हे दोघे एकूण 28 सामन्यांमध्ये आमनेसामने भिडले आहेत. 

ख्रिसने बॅटिंगसह बोलिंगनेही चमकदार कामगिरी केलेली आहे. त्याने टीम इंडिया विरुद्ध शानदार खेळी केली आहे. इतकच नाही तर, ख्रिसने सचिनला 4 वेळा आऊटही केलंय. ख्रिसने सचिनला वनडे आणि टेस्टमध्ये प्रत्येकी 2 अशा एकूण 4 वेळा मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. ख्रिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 हजार 273 धावा केल्या. केर्न्सने कसोटीत 5 तर वनडेत 4 शतकं झळकावली आहेत. तसेच 420 विकेट्सही पटकावल्या आहेत.