पराभवासह 'मौका-मौका'लाही ब्रेक; प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून आली वेगळी जाहिरात

आता पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव केला. यानंतर तेव्हा पाकिस्तानकडून एक वेगळी जाहिरात आली आहे. 

Updated: Oct 25, 2021, 03:45 PM IST
पराभवासह 'मौका-मौका'लाही ब्रेक; प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून आली वेगळी जाहिरात

मुंबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव करून पाकिस्तानने इतिहास रचला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीच्या जोरावर पाकिस्तानने 10 विकेट्स राखत विजय मिळवला. यामुळे 29 वर्षांचा सातत्या अखेर संपलं. याआधी वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला कधीही हरवलं नव्हतं, पण आता इतिहास बदलला आहे.

भारताच्या या रेकॉर्डवर बनवलेली विशेष 'मौका-मौका' जाहिरात आता संपुष्टात आली आहे. लोक सोशल मीडियावर उल्लेख करतायत की आता संधी कधीच येणार नाही, कारण रेकॉर्डच बदलला आहे. 2015 वर्ल्डकपपासून 'मौका-मौका' जाहिरात सतत चर्चेत राहिली आणि जेव्हा-जेव्हा टी-20 वर्ल्डकप किंवा 50 ओव्हर्सचा वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होतो, तेव्हा 'मौका-मौका' नवी जाहिरात आलेली पहायला मिळाली.

आता पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव केला. यानंतर तेव्हा पाकिस्तानकडून एक वेगळी जाहिरात आली आहे. या जाहिरातीत भारताच्या पराभवानंतर भारतीय चाहते निराश असल्याचं दाखवण्यात आलंय. मात्र नंतर पाकिस्तानचे चाहते येऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना टिश्यू देतात. ही जाहिरात 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या वेळची आहे, जी आता परत ट्रेंडींग झाली आहे.

या जाहिरातीला 'नो इश्यू, ले लो टिश्यू' ही थीम देण्यात आली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्स राखत पराभव केला.