मुंबई : आयपीएलसाठी (IPL 2022) आजचा दिवस मोठा आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात 8 संघ खेळताना पाहिले. पण आता आयपीएल 2022 मध्ये 10 संघ खेळणार आहेत. बीसीसीआय (BCCI) आज याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये संघ खरेदीसाठी आतापर्यंत अनेकजणांनी उत्सुकता दाखवली आहे. दोन संघांसाठी लावण्यात आलेल्या सर्व बोली आज बीसीसीआयसमोर सादर होतील, त्यानंतर बीसीसीआय दोन फ्रँचाईझींची (two new franchises) घोषणा करतील. (IPL will have two new teams, expanding the league from 8 to 10)
आयपीएल 2022 साटी दोन संघ खरेदी करण्यासाठी जवळपास 20 हून अधिक कंपन्यांनी बोली लावली आहे. अंतिम बोलीसाठी पाच ते सहा कंपन्यांची निवड होईल. नविन संघ खरेदीसाठी अदानी ग्रुप, गोएन्का ग्रुप आणि सीवीसी वेंचर्स या कंपन्या आघाडीवर आहेत. विदेशी कंपन्यांनीही आयपीएलमध्ये संघ खरेदीसाठी उत्सुकता दाखवली आहे. नव्या टीमची बेस प्राईस 2 हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.
आयपीएलच्या दोन नविन संघांसाठी लखनऊ आणि अहमदाबाद या शहरांची नावं पुढे आहे. पण याशिवाय गुवाहाटी, रांची, कटक आणि धर्मशाला या शहारांच्या नावाचीही चर्चा आहे. या सहा शहरांपैकी दोन शहरांची नावं अंतिम होऊ शकतात. अहमदाबादमधलं नरेंद्र मोदी स्टेडिअम आणि लखनऊचं इकाना स्टेडिअम फ्रँचाईझींची पसंती आहे. या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमताही मोठी आहे.
बीसीसीआय पुढच्या वर्षी मेगा लिलावाची तयारी करतंय, यात तीन खेळाडूंचं रिटेंशन होईल, तर इतर सर्व खेळाडूंवर बोली लागेल. आयपीएल 2022 साठी 10 संघ असल्याने खेळाडूंसाठी चढा-ओढही मोठी असेल. यात भारतीय खेळाडूंना सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. कारण एका संघात 7 भारतीय आणि 4 परदेशी खेळाडू असणं बंधनकारक आहे. अशात भारताच्या युवा खेळाडूंना जास्त संधी मिळू शकते.