Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माने टीम इंडियाला एशिया कप जिंकवून दिला. टी-20 लीग असतो किंवा आंतरराष्ट्रीय सामना हिटमॅनचा तुफान खेळ पहायला मिळतो. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपती मध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

सुरभि जगदीश | Updated: Sep 23, 2023, 04:31 PM IST
Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का? title=

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) याचे चाहते केवळ भारत नसून तर इतर देशातंही आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्माने टीम इंडियाला एशिया कप जिंकवून दिला. टी-20 लीग असतो किंवा आंतरराष्ट्रीय सामना हिटमॅनचा तुफान खेळ पहायला मिळतो. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपती मध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. 

सध्याच्या परिस्थितीत रोहित शर्मा टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्या खेळाची चर्चा संपूर्ण जगभरात होते. अशातच लाखो रूपयांसाठी कौन बनेगा करोडपतीमध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. 

Rohit Sharma संदर्भात विचारण्यात आला 'हा' प्रश्न

सध्या कौन बनेगा करोडपती हा लोकप्रिय कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी क्रिकेट संदर्भातील काही प्रश्न विचारण्यात आले होते. या शोमधील एका एपिसोडमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) संदर्भात तीन लाखांचा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न होता की, रोहित शर्माने कोणत्या टीमकडून आयपीएलचं पहिलं टायटलं जिंकलं होतं?

या प्रश्नाला पर्याय होते की, (a) कोलकाता नाईट राइडर्स (b) डेक्कन चार्जर्स (c) चेन्नई सुपर किंग्स (d) रायझिंग पुणे सुपरजायंट्स. या प्रश्नाचं उत्तर आहे, डेक्कन चार्जर्स. रोहित शर्माने 2008 साली डेक्कन चार्जर्स साठी आयपीएल डेब्यू केला होता. आणि 2009 साली त्याने या टीमकडून आयपीएल जिंकली होती. 

वर्ल्डकपपूर्वी आराम करतोय रोहित शर्मा

सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यामध्ये 3 वनडे सामन्यांची सिरीज सुरु आहे. यातील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला असून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र यावेळी पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियामधून रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे. आगामी वर्ल्डकप पाहता टीम इंडियामधून त्याला आराम देण्यात आला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x